शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरचा नोंदविला जबाब

By admin | Updated: February 16, 2016 01:38 IST

युवकाच्या डोक्यात सुई ठेवल्याचे प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकाद्वारे सुनावनी सुरू.

अकोला: रस्ते अपघातात जखमी झालेल्या युवकाच्या डोक्यावर टाके मारताना, बार्शिटाकळी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी डोक्यात सुई ठेवल्याने, युवकाची प्रकृती गंभीर झाल्याचा संतापजनक प्रकार ३0 जानेवारी रोजी बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात घडला होता. या प्रकरणाची चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांनी सुरू केली आहे. त्यांनी युवकाच्या डोक्यातुन सुई काढणार्‍या खासगी डॉक्टरचा सोमवारी जबाब नोंदविला आहे. याप्रकरणी दोषी वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. बाश्रीटाकळी शहरातील अकोली वेसजवळ राहणारा अब्दुल साकीब अब्दुल शब्बीर (२२) याचा २८ जानेवारी रोजी रात्री कान्हेरी-शिवापूर मार्गावर अपघात झाला होता. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याच्या डोक्यावरील जखमेवर आठ टाके मारले आणि अब्दुल साकीबला घरी पाठवून दिले; परंतु दुसर्‍या दिवसापासून युवकाचे डोके दुखायला लागले. त्यामुळे साकीबला बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात भरती केले; परंतु येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णालयात उपचार करणे शक्य नसल्याचे सांगितल्याने साकीबला अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. टाके मारताना डोक्यामध्ये सुई राहिल्याने, डोक्याला सूज आली होती. खासगी रुग्णालयात तपासणी केल्यावर साकीबच्या डोक्यातील सुई काढण्यात आल्यानंतर साकीबच्या नातेवाइकांनी बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला होता. त्यानंतर या प्रकरणाची आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यावर त्यांनी डोक्यातील सुई प्रकरणाची चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गिरी यांच्याकडे दिली होती. डॉ. गिरी यांनी बार्शिटाकळी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नेमाडे यांचा जबाब नोंदविला. तसेच वार्डबॉयचा सुद्धा जबाब नोंदविण्यात आला.