शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयातून कैदी महिलेचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 15:34 IST

. दुसरी महिला पोलीस कर्मचारी मोबाइलमध्ये गुंतलेली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अकोला : वाशिम कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेने सर्वोपचार रुग्णालयातून पलायन केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. वाशिम पोलिसांनी आता या महिलेचा शोध सुरू केला आहे.वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी उषा सुभाष गडणे या महिलेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ आणि ३२४ नुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेला अटक करण्यात आली असून, ती वाशिम जिल्हा कारागृहात कैदी आहे. या दरम्यान तिने फिनाइन प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ८ आॅक्टोबर रोजी रात्री उशिरा तिला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक- ७ मध्ये या कैदी महिलेवर उपचार सुरू असताना तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाखरे आणि क्षीरसागर नामक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी दोन्ही महिला कर्मचारी तिला दिसल्या नाही. याच संधीचा फायदा घेत तिने वॉर्डातून पळ काढला. यामधील एक महिला पोलीस कर्मचारी परत आली असता तिला कैदी महिला पळून गेल्याचे दिसले. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात खळबळ माजली. यासंदर्भात महिला पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाºयाच्या पोटात त्रास असल्याने औषध आणण्यासाठी बाहेर गेल्याची माहिती दिली. दुसरी महिला पोलीस कर्मचारी मोबाइलमध्ये गुंतलेली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही कैदी महिला पळाल्याने य दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवणार असून, आता वाशिम पोलिसांनी पळून गेलेल्या उषा गडण यांचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय