शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह काेराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

अकाेला : अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ४५७ कैदी असून, यामधील सुमारे १३५ कैद्यांना काेराेनाचा चांगलाच फटका बसला हाेता़ एकाचवेळी ...

अकाेला : अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ४५७ कैदी असून, यामधील सुमारे १३५ कैद्यांना काेराेनाचा चांगलाच फटका बसला हाेता़ एकाचवेळी या कैद्यांना काेराेनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले हाेते़ मात्र, त्यानंतर आवश्यक त्या उपाययाेजना करून तसेच खबरदारी घेत आता कारागृह काेराेनामुक्त झाले आहे़ नवीन येणाऱ्या कैद्यांपासून इतर कैद्यांना धाेका निर्माण हाेऊ नये म्हणूण नवीन कैद्यांना रेल्वे स्टेशननजीक असलेल्या तात्पुरत्या कारागृहात १४ ते १५ दिवस ठेवण्यात येते व त्यानंतरच त्यांना दाेन वेळा काेराेना चाचणी केल्यानंतर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे़

अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ४५७ कैदी व तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. काेराेनाच्या भीषण संकटामुळे येथील काही कैद्यांना जामिनावर साेडण्यात आले आहे, तर गंभीर गुन्ह्यातील कैदी आता कारागृहात आहेत़ या कैद्यांची आकडेवारी सुमारे ४५७ असून त्यांना काेराेना हाेऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययाेजना कारागृह प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले असून, कैद्यांना कारागृहात सामाजिक अंतर पाळण्यासाठी नियम ठरवून देण्यात आले आहेत, तर कुणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे़ त्यामुळे काेराेना राेखण्यात कारागृह प्रशासनाला यश आले आहे़

१०० टक्के लसीकरण

कारागृहातील ४५७ कैद्यांसह ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे़ येथील सर्वांनाच पहिला डाेस देण्यात आला असून, आता लवकरच दुसरा डाेस देण्याचीही तयारी कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे़ आराेग्य विभागाकडूनही वारंवार तपासणी करण्यात येत असून, यामध्ये गत अनेक महिन्यांपासून एकाही कैद्याला किंवा कर्मचाऱ्याला काेराेना झाला नसल्याचे वास्तव आहे़

नवीन कैद्यांना ठेवतात तात्पुरत्या कारागृहात

मध्यवर्ती कारागृहात ४५७ कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे़ यामध्ये कुणालाही काेराेना नसल्याने नवीन कैद्यांपासून त्यांना काेराेनाचा धाेका निर्माण हाेऊ नये म्हणूण शिक्षा झालेल्या तसेच नव्याने गुन्हा केलेल्या कैद्यांना तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांसाठी ठेवण्यात येते़ त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर व ॲन्टिजन टेस्ट केल्यानंतरच त्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येत आहे़

काेट

काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये म्हणून कारागृह प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे़ येथील कैद्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे़ मात्र, तरीही काेराेनाला राेखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययाेजना करण्यात येत असून, त्यासाठी सर्वांचीच आराेग्य तपासणीही वारंवार करण्यात येत आहे़

सुभाष निर्मळ

कारागृह अधीक्षक, अकाेला