शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपुर्वी मनोज तायडे, कृष्णा अंधारे स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 15:09 IST

मनोज तायडे व कृष्णा अंधारे या दोन नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी अकोल्यात येणार असल्याच्या पृष्ठभूमीवर शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे व कृष्णा अंधारे या दोन नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी या दोन्ही नेत्यांना त्यांच्या घरून ताब्यात घेतले असून, सद्या त्यांना रामदास पेठ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी अकोल्यात येणार असून, सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस खबरदारी घेत आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेत कमी मोबदला मिळाला म्हणून वाढीव मोबदल्याची मागणी करीत बाळापूर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या पृष्ठभूमीवर शेतकरी नेते आक्रमक झाले असून, महाजनादेशयात्रेनिमित्त अकोल्यात येणार असलेल्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचे नियोजन शेतकरी जागर मंचाकडून करण्यात आले होते. याची कुणकुण लागताच रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळीच मनोज तायडे व कृष्णा अंधारे या दोघांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. दरम्यान, ही प्रतिबंधात्मक कारवाई असून, कोणतीही दडपशाही करण्यात येत नसल्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाShetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन