शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकीचे भाव एक हजार रुपयांनी वधारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:22 IST

सरकीचे भाव तब्बल एक हजार रुपयांनी वाढल्याने सरकीवरील प्रक्रिया साखळीतील तेल, ढेप आणि सरकी साबणाच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

- संजय खांडेकरअकोला : कापसापाठोपाठ आता सरकीचे भावही प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी वधारले आहेत. सरकीचे भाव तब्बल एक हजार रुपयांनी वाढल्याने सरकीवरील प्रक्रिया साखळीतील तेल, ढेप आणि सरकी साबणाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. पाच महिन्यांआधी दोन हजार रुपये क्विंटलने विकली जाणारी सरकी आता तीन हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरात पोहोचली आहे.कापसाचे भाव पाच महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने चढतीवर असून, ते आता ६५०० प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. कापसाचे भाव वधारल्याने कापसाच्या बोंडातून निघणाऱ्या सरकीचे भाव त्यापाठोपाठ वाढले आहे. जेवढी मागणी कापसाला आहे, तेवढीच मागणी सरकीलादेखील आहे. कारण एका क्विंटल कापसातून ६२-६३ टक्के सरकी आणि इतर ३६-३७ टक्के कापूस निघतो. त्यामुळे कापूस पिकातून सरकी जास्त निघत असल्याने सरकी प्रक्रिया साखळीत तेल, ढेप आणि साबण निर्मितीच्या उद्योगावरही परिणाम पडतो. सरकीचे भाव वधारल्याने सरकी तेल, ढेप आणि सरकीपासून तयार होणाºया साबणाच्या किमतीही काही अंतराने वाढल्या आहेत.महाराष्ट्रातील ६० टक्के सरकी तेल गुजरातमध्येभारताच्या विविध प्रांतात विविध प्रकारच्या खाद्यतेलाची मागणी आहे. त्यात सोयाबीन, राईस, पाम, सरसो, खोबरा, जवस, शेंगदाणा यांचा समावेश आहे; मात्र गुजरातकडून सरकी तेलाची मागणी कायम असते. विविध प्रकारचे लोणचे घालण्यासाठी आणि दैनंदिन खाद्यासाठी गुजरातकडे सरकी तेलाची मागणी सर्वात जास्त असते. महाराष्ट्रात निर्मित ६० टक्के सरकी तेल गुजरातच्या एकट्या राज्यात जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कापूस आणि जवसाचा पेरा विदर्भात जास्त असताना, संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात सरकी, जवस आणि शेंगदाणा खाद्यतेलाचा वापर होत असे; मात्र अलिकडे विदर्भवासींनी सोयाबीन आणि इतर खाद्यतेलास प्राधान्य दिले आहे; मात्र गुजरातच्या नागरिकांनी अद्याप सरकी तेलाचा वापर सुरू ठेवला आहे.-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय