शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

तुरीचे दर घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:05 IST

अकोला: यावर्षी तुरीचे उत्पादन घटले असून, दरही कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणूनच शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अकोला: यावर्षी तुरीचे उत्पादन घटले असून, दरही कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणूनच शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. बाजारात तुरीचे दर सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर १,२७५ रुपयांनी कमी आहेत.यावर्षी महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, असे असले तरी खरेदी प्रत्यक्षात खरेदी सुरू केव्हा होते, हे महत्त्वाचे आहे. बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे; पण उत्पादन प्रचंड घटले असून, एकरी ७५ किलो ते एक क्ंिवटलपर्यंत आहे. शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने सध्यातरी तूर उत्पादक भागातील बाजारात सरासरी आवक दोनशे पन्नास क्ंिवटलपर्यंत सुरू आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी २७५ क्ंिवटलपर्यंत तुरीची आवक सुरू आहे. यावर्षी कापूस, मूग, उडीद इतर सर्वच खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकºयांना तूर विकण्यावाचून पर्याय नाही म्हणूनच अल्पभूधारक शेतकºयांना तूर विकावी लागत आहे. अशावेळी शासनाने किमान आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा गतवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकºयांची लूट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.तुरीला यावर्षी ५,६७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आला आहे; पण खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने या दराचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला असून,बाजारात तुरीचे दर ४,८०० पर्यंत होते त्यात ३०० ते ४०० रू पयाने घट झाली आहे.फेडरेशनने आता खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव सहकारी संस्थांकडून मागविले आहेत. प्रस्तावात अनेक अटी असल्याने किती संस्था खरेदी केंद्र सुरू करण्यास तयार होतात, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. फेडरेशन प्रतवारी, आर्द्रतेचे निकष लावून तूर खरेदी करते, यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने हे निकष काही प्रमाणात शिथिल करण्याची गरज तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

- शेतकरी व्यापाºयांना कमी दरात तूर विकत असल्याने शासनाने तूर खरेदीसाठीची आॅनलाइन नोंदणी तातडीने सुरू करण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांनी कमी दरात तूर विकणे सुरू केले, त्यांना भावांतर योजनेंतर्गत हमीदरातील फरक देण्याची घोषणा करावी.डॉ. प्रकाश मानकर,चेअरमन,भारत कृषक समाज (महाराष्ट्र)

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती