शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

आधी ठरविले कामचुकार; आता नियुक्तीसाठी शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:21 IST

अकोला: महापालिकेत सेवारत १३१ मानसेवी कर्मचाºयांना प्रशासनाने नुकतीच चार महिन्यांची मुदतवाढ दिली. तत्पूर्वी, मनपाच्या निर्देशांचे पालन न करणे, प्रशासकीय कामकाज करताना दुजाभाव करणाºया भ्रष्ट प्रवृत्तीच्या कर्मचाºयांची सेवा बंद करण्यात आली होती.

अकोला: महापालिकेत सेवारत १३१ मानसेवी कर्मचाºयांना प्रशासनाने नुकतीच चार महिन्यांची मुदतवाढ दिली. तत्पूर्वी, मनपाच्या निर्देशांचे पालन न करणे, प्रशासकीय कामकाज करताना दुजाभाव करणाºया भ्रष्ट प्रवृत्तीच्या कर्मचाºयांची सेवा बंद करण्यात आली होती. अशा कर्मचाºयांची पुन्हा मानसेवी पदासाठी आजी-माजी नगरसेवकांकडून शिफारस केली जात असून, ‘बॅक डोअर एन्ट्री’साठी राजकीय कसब पणाला लावल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारणाºया अधिकाºयांच्या मनाचा व कार्यशैलीचा अंदाज बांधून काही विशिष्ट राजकारणी त्यांच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवितात, असा नेहमीचा अनुभव आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कार्यकाळात कागदावर विकास कामे दाखवून मनपाच्या तिजोरीची लूट करणाºया कंत्राटदार व अधिकारी-कर्मचाºयांचे पितळ उघडे झाल्यानंतर अशा प्रवृत्तींना चाप बसला होता. माजी उपमहापौर तथा भाजपाचे विद्यमान नगरसेवक विनोद मापारी यांच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये केवळ कागदोपत्री बांधकाम दाखवून शिव उद्यानच्या आवारभिंतीचे लाखो रुपये घशात घातल्याचे प्रकरण अनेकांच्या अंगलट आले. यासह नाली, रस्त्याचे बांधकाम कागदोपत्री दाखवून लक्षावधी रुपयांची देयके लाटण्यात आली. हा प्रकार कमी म्हणून की काय, एका माजी नगरसेवकाच्या प्रभागातील विहिरीचा गाळ काढण्यासाठी तब्बल १३ लाख रुपयांची फाइल तयार करण्यात आली होती. अशा कामांसाठी मानसेवी कर्मचाºयांचा पद्धतशीरपणे वापर करण्यात आला. अशा मानसेवी कर्मचाºयांची मनपाप्रती निष्ठा लक्षात घेता त्यांची सेवा बंद करण्यात आली होती, हे विशेष.प्रशासनावर दबावतंत्राचा वापरमनपात २२ जानेवारी रोजीच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने १३१ मानसेवी कर्मचाºयांना मुदतवाढ दिली. त्यानंतर काही आजी-माजी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाच्या माध्यमातून आणखी नऊ जणांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची माहिती आहे. या दबावतंत्राला मनपा आयुक्त संजय कापडणीस बळी पडतात की स्वत:च्या निर्णयावर ठाम राहतात, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.सभागृहात पाठराखण कशासाठी?प्रभाग क्रमांक २० मध्ये कागदोपत्री विकास कामे दाखवून शासनाच्या लाखो रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाने बांधकाम विभागातील खादाड अधिकारी, मानसेवी कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित केली होती. संबंधित कर्मचाºयांना वाचविण्यासाठी सभागृहात अनेक नगरसेविका, नगरसेवकांनी घसे कोरडे केले होते. भाजपाच्या कार्यकाळात भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकारी-कर्मचाºयांची पाठराखण होत असल्याने पक्षात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.

अतिक्रमण काढताना दुजाभावशहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येला मनपाच्या अतिक्रमण विभागातील खादाड प्रवृत्ती कारणीभूत ठरल्या आहेत. मनपा पदाधिकारी, नगरसेवकांनी तक्रारी केल्यानंतरही त्या-त्या भागातील अतिक्रमण हटविताना काही कर्मचारी दुजाभाव करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. खिसे जड करणाऱ्या मर्जीतल्या अतिक्रमक ांना कारवाई सुरू होण्यापूर्वीच सूचना दिली जात होती. हा प्रकार लक्षात घेता प्रशासनाने अशा कर्मचाºयांची सेवा बंद केली होती. त्यांना पुन्हा सेवेत घ्या, अशी विनवणी आजी-माजी नगरसेवकांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका