शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

‘कोरोना’वर प्रतिबंधात्मक उपाय हाच बचाव! - डॉ. फारुख शेख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 14:58 IST

सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी दिला आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘कोरोना’विषयी अनेक समज, गैरसमज पसरले आहेत. अशातच ऋतुबदलाच्या काळात सर्दी, खोकला आणि ताप आदी समस्या उद््भवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु सर्दी, ताप, खोकला म्हणजे कोरोना नाही. मुळात कोरोनाचा संसर्ग हा त्याची लागण झालेल्या व्यक्तींकडूनच पसरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला न घाबरता सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी दिला आहे.

विदेशातून येणाऱ्या नागरिकांपासून ‘कोरोना’चा धोका आहे का?जोपर्यंत त्या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीपासून कोरोनाचा धोका नाही; मात्र सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. म्हणून अशा व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करून १४ दिवसांसाठी इतरांच्या सहवासात येणे टाळावे, जेणेकरून संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, असे केल्यास अशा व्यक्तींकडून धोका नाही.अकोलेकरांना ‘कोरोना’चा धोका आहे का?मुळात कोरोना विषाणू स्थानिक लोकांमध्ये नाही. त्यामुळे त्याचा धोका नाही; परंतु विदेशातून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल आणि त्याच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली असेल, तर त्या व्यक्तीला कोरोनाचा धोका संभवू शकतो.‘कोरोना’चा धोका टाळता येऊ शकतो का?नक्कीच, प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून कोरोनाचा धोका टाळता येऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी हॅण्ड सॅनिटायझर किंवा साबणाद्वारे नियमित हात धुवावे. नाक, टोळे तसेच तोंडाला हात लावणे टाळावे. सर्दी, खोकला, ताप असेल तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करावी.विदेशातून येणाºया नागरिकांनी काय काळजी घ्यावी?वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्याशिवाय कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत नाही. त्यामुळे विदेशातून आलेल्या व्यक्तींनी आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, १४ दिवस घरात स्वतंत्र खोलीत राहावे, इतरांशी संपर्क टाळावेत, नियमित सर्जिकल मास्कचा उपयोग करावा.‘कोरोना’विषयी नागरिकांची जबाबदारी काय असावी?सर्वप्रथम नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवूनये, कोणी अफवा पसरवत असेल, तर त्याला कोरोनाविषयी योग्य माहिती द्यावी, सोशल मीडियावर कुठलाही रुग्ण किंवा संशयित रुग्णाचे नाव त्यांचे फोटो व्हायरल करूनये, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका