शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जनजागृतीतून करा एड्स, कॅन्सरला प्रतिबंध - जिल्हाधिकारी

By atul.jaiswal | Updated: December 1, 2017 15:44 IST

अकोला: एड्स तसेच तंबाखू जन्य पदार्थ्यांच्या सेवनाने होणारे कॅन्सर सारखे रोग कोणतीही उपचाराने पुर्णपणे बरे होवू शकत नाही. त्यामुळे जनजागृती हाच एक प्रतिबंध उपाय व उपचार आहे. यासाठी परिवारातील लोकांनी संवाद साधून व्यसनाबाबत जनजागृती करून अशा रोगांचा प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

अकोला: एड्स तसेच तंबाखू जन्य पदार्थ्यांच्या सेवनाने होणारे कॅन्सर सारखे रोग कोणतीही उपचाराने पुर्णपणे बरे होवू शकत नाही. त्यामुळे जनजागृती हाच एक प्रतिबंध उपाय व उपचार आहे. यासाठी परिवारातील लोकांनी संवाद साधून व्यसनाबाबत जनजागृती करून अशा रोगांचा प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.पर्यावरणाच्या रक्षणासाठी दर महिन्याच्या एक तारखेला ‘सायकल डे’साजरा करण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सुरु केला. त्या बरोबरीने एक सामाजिक संदेशही ते जनतेला देतात. राष्ट्रीय एडस दिनानिमित्य तसेच मौखिक आरोग्य तपासणी मोहिम अंतर्गत एडस व तंबाखू जन्य पदार्थ्यांच्या सेवनाबाबत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली.  स्वत: जिल्हाधिकारी सकाळी ८.३० वाजता आपल्या बंगल्यावरुन खंडेलवाल टॉवर मार्गे अग्रसेनचौक, दुर्गा चौक ते रतनलाल चौक मार्गे नेहरू पार्क चौक , अशोक वाटीका ते सर्वोपचार रूग्णालय येथे सायकलवरुन पोहोचले. यावेळी त्यांच्या समवेत यावेळी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर , शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते , जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चौहान , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आदींसह अधिकारी,कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.

मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन

सर्वोपचार रूग्णालय येथे जागतीक एड्स दिनानिमित्य व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संदेश दिला. यावेळी महापौर विजय अग्रवाल , पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते , जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चौहान , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. उम. राठोड, उपविभागीय अधिकारी प्रा. संजस खडसे, गुणवंत शिक्षण संस्थेच्या अरूंधती शिरसाठ, जि. प. सदस्य प्रतिभा अवचार आदींसह अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

संचालन प्रकाश अंधारे व रिना धोटे यांनी केले.यावेळी उपस्थितांनी जागतिक एडस दिनानिमित्यतसेच मौखिक आरोग्य तपासणी मोहिम अंतर्गत शपथ घेतली. आभार प्रदर्शन एच.आय.व्ही एडस निमुर्लन कार्यक्रमाचे समन्वयक दर्शन जनईकर यांनी केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcollectorतहसीलदार