शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राष्ट्रपती निवडीचा जल्लोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:30 IST

भाजपा कार्यालयासमोर आतषबाजी : लोकप्रतिनिधींनी धरला फेर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रपती पदासाठी भाजपाप्रणीत रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी ६६ टक्के मते घेऊन विजय संपादित केला. देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून कोविंद यांची निवड होताच भाजपाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, महापौर विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, अकोला तालुका अध्यक्ष अनिल गावंडे, मा.जि.प. अध्यक्ष श्रावण इंगळे, वसंत बाछुका, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, रावसाहेब कांबे,चंदा शर्मा, रवी गावंडे, विलास पोटे, डॉ. विनोद बोर्डे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. साधी राहणी व उच्च विचार असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवड म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असण्यासोबतच प्रत्येक भारतीयाचा सन्मान असल्याचे खा. संजय धोत्रे यांनी सांगितले. भाजपाचा निर्णय देशहिताचा असून, रामनाथ कोविंद यांच्या रूपाने रामराज्याची संकल्पना साकार होण्याची ही सुरुवात असल्याचे प्रतिपादन आ. गोवर्धन शर्मा यांनी केले. समाजातील सर्वच घटकांनी देशाच्या विकासाला हातभार लावला आहे. भाजपाच्या नेतृत्वाला योग्य व्यक्तींची पारख असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी नमूद केले. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची हजेरीरामनाथ कोविंद यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी पक्ष कार्यालयासमोर जिल्हाभरातून कार्यकर्ते दाखल झाले होते. अकोला तालुक्यातील म्हातोडी, म्हैसांग, आपातापा, अनकवाडी, चोहोट्टा परिसरातून परंपरागत ढोल, ताशे साहित्यासह गोंधळी समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी महापालिकेतील भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आ. गोवर्धन शर्मा यांनी टाळ वाजवून कार्यकर्त्यांसोबत फेर धरला.