शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगतची दारू दुकाने सुरू करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 14:02 IST

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्गापासून ठरवून दिलेल्या अंतरासोबतच निकषांची पूर्तता होणाऱ्या गावांमध्ये दारू दुकाने, बीअर बार सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मागवलेली माहिती जिल्हा परिषदेने पाठवली आहे.

ठळक मुद्दे ग्रामपंचायत हद्दीतील अंतराची अट पाळणाऱ्या तसेच ठरवून दिलेल्या निकषाची पूर्तता करणाऱ्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही सुरू केली. त्या दुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण २०१७-१८ व २०१८-१९ या कालावधीसाठी केले जाणार आहे. निकषांची पडताळणी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाकडूनच ग्रामपंचायतींची माहिती मागवली.

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्गापासून ठरवून दिलेल्या अंतरासोबतच निकषांची पूर्तता होणाऱ्या गावांमध्ये दारू दुकाने, बीअर बार सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मागवलेली माहिती जिल्हा परिषदेने पाठवली आहे. त्यामुळे या गावांतील दुकानांच्या परवान्याचे लवकरच नूतनीकरण करण्याची तयारी उत्पादन शुल्क विभागात सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील दारू दुकाने, बीअर बार तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आली. गेल्यावर्षी ३१ मार्चपूर्वी दुकानांचे राष्ट्रीय महामार्गापासून अंतर मोजण्यात आले. त्यानुसार त्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचे परवाने नूतनीकरण थांबवण्यात आले. परिणामी, जिल्ह्यातील महामार्गावर असलेल्या गावातील जवळपास सर्वच दारू दुकाने, बीअर बार बंद झालीत. त्यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणात १३ डिसेंबर २०१७, २३ फेब्रुवारी २०१८ रोजी न्यायालयाने आदेश दिले. त्या आदेशानुसार ग्रामपंचायत हद्दीतील अंतराची अट पाळणाऱ्या तसेच ठरवून दिलेल्या निकषाची पूर्तता करणाऱ्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही सुरू केली. त्या दुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण २०१७-१८ व २०१८-१९ या कालावधीसाठी केले जाणार आहे. त्या निकषांची पडताळणी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाकडूनच ग्रामपंचायतींची माहिती मागवली.त्या निकषांमध्ये किमान लोकसंख्या पाच असलेले क्षेत्र, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र असल्यास, किंवा जागतिक वारसा पर्यटन स्थळ, केंद्र शासन, राज्य शासनाने घोषित केलेले पर्यटन स्थळ, तीर्थक्षेत्र वगळून किंवा ज्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला, असे क्षेत्र या बाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आली.

 विकास आराखड्याची दिली माहितीनिकषातील विकास आराखडा शासनाने मंजूर केला का, याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने दिली. मात्र, हा विकास आराखडा १४ व्या वित्त आयोगातून ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत तयार केलेला आहे. शासन स्तरावरून ग्रामपंचायतीसाठीचा विकास आराखडा मंजूर केलेल्या ग्रामपंचायतीची माहिती त्यात आहे की नाही, ही बाब वेगळी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद