शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अकोल्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या तयारीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 16:41 IST

अकोला: गत बारा वर्षांपासून अकोला शहरातील स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची तयारी प्रारंभ करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२३ ते २५ डिसेंबरला होणार आयोजन

अकोला: गत बारा वर्षांपासून अकोला शहरातील स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची तयारी प्रारंभ करण्यात आली आहे. या वर्षी राष्ट्रसंतांच्या ४९ वा पुण्यतिथी महोत्सव अनेक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.दि.२३ डीसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत चालणाºया या तीन दिवसीय महोत्सवात राष्ट्रसंतांच्या विचारांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वैचारिक मंथन होणार आहे. नवतरुणात राष्ट्रसंतांच्या विकास व सामाजिक उन्नतीचे विचार रुजविण्यासाठी समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांची रेलचेल स्वराज्य भवन प्रांगणात असते. यात प्रवचन, भजन, बाल भजने, राष्ट्रीय कीर्तनकारांनी कीर्तने, युवक व महिला कार्यकर्ता संमेलन, सर्वधर्म मौन श्रद्धांजली, योग प्राणायाम, व्यसनमुक्ती, वैचारिक प्रबोधन सोहळा, सुफी वैचारिक भजने, नामवंत प्रचारक व साहित्यिकांची उपस्थिती आदी कार्यक्रम या संमेलनाचे वैशिष्ट्य असते. प्रारंभ दिनी राजेश्वर मंदिरापासून राष्ट्रसंतांनी शेकडो गुरुदेव भक्तांसमवेत भव्य शोभायात्रा काढण्यात येत असते. यावर्षीही अशीच वैचारिक प्रबोधनाची मेजवानी गुरुदेवभक्तांना मिळणार आहे. या संदर्भात समितीची बैठक समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. यावेळी रविंद्र मुंडगावकर, शेख गुरुजी, डॉ.त्र्यंबकराव आखरे, डॉ.गजानन काकड, अ‍ॅड.संतोष भोरे, डॉ.प्रकाश मानकर, सहदेवराव खांबालकर, रवींद्र पाटील, अनिल हरणे, सुरेश राऊत, ज्ञानेश्वर साकारकर, शिवाजीराव म्हैसने, वसंत माळी, तुळशीराम चतरकार, डॉ.अजय उपाध्याय, पांडुरंग वाराणकर, नारायण मानकर, भास्कर वानखडे समवेत समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

टॅग्स :cultureसांस्कृतिक