शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘कासोधा’च्या आश्‍वासनपूर्तीसाठी पुन्हा आंदोलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:02 IST

अकोला : कासोधा परिषदेनंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या.

ठळक मुद्देशत्रुघ्न सिन्हांचाही होकार शेतकरी जागर मंचने  दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कासोधा परिषदेनंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या. १५ जानेवारीपर्यंत या मागण्यांची पूर्तता होईल, असे  पत्रही  प्रशासनाने आंदोलकांना दिले. मात्र, आंदोलनातील मागण्यांच्या पूर्ततेच्या दिशेने एकही पाऊल उचलले नाही. याबाबत आता सरकाराला जाब विचारण्यासाठी यशवंत सिन्हा पुन्हा अकोल्यात येणार असून, त्यांच्या सोबतीला शत्रुघ्न सिन्हाही असतील, अशी माहिती शेतकरी जागर मंचच्यावतीने देण्यात आली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर, शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या चर्चेदरम्यान शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी लेखी दिले होते. आंदोलनाचे हे मोठे यश होते. आंदोलनाची वाढलेली व्याप्ती, सत्ताधारी भाजपा वगळता सर्वच पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता, या मागण्यांबाबत शासन तत्परतेने कारवाई करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र या मागण्यांसंदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. मंगळवारी दिल्ली येथे यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रमंच’ची पायाभरणी झाली आहे. या बैठकीसाठी अकोल्यातून दिल्ली येथे गेलेल्या शेतकरी जागर मंचच्या पदाधिकार्‍यांसोबत यशवंत सिन्हा यांनी चर्चा केली. या चर्चेमध्ये कासोधाच्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी यशवंत सिन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधी संवाद साधणार असून, त्यानंतर आंदोलनाची भूमिका घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे प्रख्यात अभिनेते व भाजपाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही सदर आंदोलनासाठी अकोल्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

कासोधा आंदोलनाच्या सांगतेप्रसंगी प्रशासनामार्फत शासनाने दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकारकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता सरकारवर दबाव निर्माण करण्याची भूमिका घेणार आहोत. दिल्ली येथे यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीत चर्चा झाली व दोघांनीही अकोल्यात आंदोलनासाठी येण्याची तयारी दर्शविली आहे. - प्रशांत गावंडे, शेतकरी जागर मंच

टॅग्स :Kasodha Parishadकासोधा परिषदAkola cityअकोला शहरShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाYashwant Sinhaयशवंत सिन्हा