शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

पाणी, सिंचन, वीज प्रश्नांवर प्रसंगी संघर्षाची तयारी

By admin | Updated: November 16, 2014 00:46 IST

आ. हरीश पिंपळे यांची मूर्तिजापूर मतदारसंघात भौगोलिक परिस्थितीवर आधारीत विकास योजनांना प्राधान्य देण्याची ग्वाही.

अकोला : सिंचन, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आदी विकास कामांपासून दूर राहिलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील हे प्रश्न मार्गी लावताना भौगोलिक परिस्थितीवर आधारित विकास योजनांना प्राधान्य देऊ. या योजना मार्गी लावण्यासाठी प्रसंगी आपल्याचे सरकारच्याविरुद्ध संघर्ष करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन आमदार हरीश पिंपळे यांनी ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमात शनिवारी बोलताना केले. याप्रसंगी त्यांनी मतदारसंघात राबविण्यात येणार्‍या विकास योजनांसोबत जिल्ह्यातील राजकारणावर लोकमतच्या संपादकीय विभागातील सहकार्‍यांसोबत मनमोकळी चर्चा केली. प्रश्न :सलग दुसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमच्या योजना काय आहेत?आ. पिपळे : मूर्तिजापूर या विधानसभा मतदारसंघात भौगोलिक विविधता आहे. त्यामुळे या परिसरांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. प्रामुख्याने मतदारसंघात जाणविणारी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. ते सोडविण्यासाठी यापूर्वीपासूनच प्रयत्न केले आहेत. नैसर्गिक पाणीस्त्रोतांसोबतच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी मतदारसंघातील नदी जोड प्रकल्प, गाळ काढण्याची योजना आणि वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.प्रश्न-मूर्तिजापूर तालुक्यातील कोणत्या कामांना प्राधान्य द्याल?आ. पिपळे : पाणी हा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. नागरिकांना पिण्यास पाणी मिळावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू असून, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत तालुका स्वयंपूर्ण करण्यावर भर देणार आहेत. पाणीपुरवठय़ाची काही कामे मार्गी लागली आहेत. या शिवाय शेतकर्‍यांना ओलितासाठी नियमित; परंतु दिवसा सकाळी ८ ते सायंकाळपर्यंत शेताला पाणी देता यावे, याकरिता दिवसाचा वीज पुरवठा सुरळीत व नियमित करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.प्रश्न- तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचे अर्धवट काम पूर्ण होईल का?आ. पिपळे : या तालुक्याला तीन नद्यांचे वरदान मिळाले आहे. उमा नदीवर बॅरेजचे काम सुरू आहे. वाई संग्राहकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या प्रकल्पांतर्गत येणार्‍या गावाचे पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. या तीनही नद्याच्या पाण्याचा लाभ या तालुक्याला झाल्यास हा तालुका सिंचनाच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर राहील आणि माझे स्वप्न तेच आहे. त्यादृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे.प्रश्न- रुग्णालय अधिकक्ष कॅडरच्या लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयाचा कायापालट होईल का?आ. पिपळे : मूर्तिजापूरला हे चांगले रुग्णालय आहे. या ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्यास अकोल्याच्या रुग्णालयावरील ताण कमी होईल; परंतु गेली अनेक वर्षांपासून या रुग्णालयाचा पदभार घेण्यास डॉक्टर धजावत नाहीत, ज्या डॉक्टरांनी पदभार घेतला, त्यांनी स्वत:चे रुग्णालय थाटले आहे. पण तालुक्यातील जनतेला उत्तम रुग्णसेवा मिळावी, यासाठीचे आपले प्रयत्न राहणार आहेत.प्रश्न- आपल्या गळ्य़ात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे, खरे काय?आ. पिपळे : मला माहीत नाही, जिल्हय़ाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे मंत्रिपद पण ज्येष्ठतेनुसार दिले जाईल. ज्येष्ठांनी जर नकार दिला आणि पक्षाने जबाबदारी सोपविली तर मी संधीचं सोनं करेन, एवढी मात्र खात्री देतो. प्रश्न- गाडगेबाबांची कर्मभूमी म्हणून मूर्तिजापूरची ओळख आहे. त्यादृष्टीकोणातून येथे असलेल्या गाडगेबाबांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या स्मारकाच्या विकासासाठी काय प्रयत्न करणार?आ. पिपळे : संत गाडगेबाबांचे कार्य सर्वांंसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यातील बहुतांश काळ मूर्तिजापूर तालुक्यात घालविला. त्यामुळे त्यांची ही कर्मभूमी आहे. येथे त्यांच्या कार्याचा वसा जपण्याचा दावा करणार्‍यांनी प्रामाणीकपणे काम केले नाही. त्यामुळे गाडगेबाबांचे येथील काम शासनाच्यालेखी दुर्लक्षित राहिले. आता गाडगेबाबांच्या स्मारकांचा विकास करण्यासाठी एक आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठवू आणि त्यावर अंमलबजावणी करून घेण्यासाठी पाठपुरावा करू. तालुक्यात आदर्श गावासाठी निवड करावयाची झाली तर दापुरा गाव दत्तक घेऊन ते आदर्श करवून दाखवू.