शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कर्मचार्‍यांसाठी मुदतपूर्व सेवानवृत्ती योजना

By admin | Updated: March 27, 2017 14:17 IST

लाइन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ आदी पदांसाठी १ एप्रिल २0१७ पासून मुदतपूर्व सेवानवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.

१ एप्रिलपासून होणार लागू: वर्ग-३ व ४ च्या कर्मचार्‍यांना होणार फायदाअकोला : महावितरणच्या वर्ग-३ आणि ४ च्या लाइन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ आदी पदांसाठी १ एप्रिल २0१७ पासून मुदतपूर्व सेवानवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचार्‍याने वयाची ४५ वर्षे पूर्ण होणे अनिवार्य आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.जे तारमार्ग कर्मचारी आपली दैनंदिन कर्तव्ये आजारपण, अपघात आदी कारणांनी पार पाडू शकत नाही, अशा वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या संवर्गासाठी मुदतपूर्व सेवानवृत्ती योजना लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्ग-३ मध्ये मोडत असलेल्या कर्मचार्‍याची वयोर्मयादा ४५ वर्षे पूर्ण आणि ५३ वर्षांपर्यंत असणे आणि वर्ग-४ साठी ४५ वर्षे पूर्ण आणि ५५ वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी दैनंदिन कामे सुरळीत पार पाडू शकत नाही, अशा आशयाचे सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी मुदतपूर्व सेवानवृत्ती त्यांच्या पाल्यासाठी ह्यविद्युत सहायकह्ण पदावरील नोकरी हा पर्याय शाबूत ठेवून घेत आहेत, त्यांचा पाल्य दहावी, बारावी उत्तीर्ण असणे अथवा दहावी, बारावीनंतर इलेक्ट्रिकल/वायरमनचा आयटीआय हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.जे कर्मचारी आपल्या पाल्यांना नोकरीचा पर्याय न ठेवता या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना या योजनेनुसार सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी ३५ दिवसांचे वेतन आणि विहित सेवानवृत्ती पूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचे वेतन अशा सूत्रानुसार एकूण लाभ मिळणार आहे. हा लाभ एकूण जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंतच राहील. कर्मचार्‍याच्या पाल्याच्या नोकरीसाठी या योजनेत पाल्याची वयोर्मयादा १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिल) अशी आहे. सदर योजनेचा लाभ १ एप्रिल २0१७ ते ३0 सप्टेंबर २0१७ या कालावधीतच घेता येणार असल्याचे महावितरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.