बोरगाव मंजू (अकोला): अल्पवयीन मुलगा व अल्पवयीन मुलीमध्ये प्रस्थापित झालेल्या अनैतिक संबंधातून मुलीला गर्भधारणा झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उजेडात आला. या प्रकरणी गोरेगाव येथील मुलावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात बलात्कार व मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गोरेगाव येथील एका १६ वर्षीय मुलाचे नातेवाईक कौलखेड येथे राहतात. त्यामुळे तो नेहमीच कौलखेड येथे जात -येत होता. दरम्यान, त्याचे तेथीलच एका १६ वर्षीय मुलीशी सूत जुळले. दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातूनच तिला गर्भधारणा झाली होती. अखेर या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित मुलाला ताब्यात घेतले आहे. तपास विशेष तपास अधिकारी जयसिंग पाटील, हेड कॉन्स्टेबल देवानंद दंदी करीत आहेत.
अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलीला झाली गर्भधारणा
By admin | Updated: December 17, 2015 02:17 IST