शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

विधानसभेत निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य; आढावा बैठकीत अरविंद सावंत यांचे सुताेवाच

By आशीष गावंडे | Updated: July 15, 2024 21:00 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी झाली बैठक

आशिष गावंडे, अकाेला: ज्यांनी मातेसमान शिवसेना पक्षात फुट पाडली,पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केला, अशा विराेधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी आगामी विधानसभेत निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे शिवसेनेचे (उध्दव सेना) खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी खा.सावंत साेमवारी अकाेल्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला. 

लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी विधानसभेच्या २८८ जागांची चाचपणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यापृष्ठभूमिवर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाेबत खा.अरविंद सावंत यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉल येथे संवाद साधला. बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अमरावतीचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, वसंतराव भोजने, यवतमाळचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, वर्धाचे जिल्हाप्रमुख आशिष पांडे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार विश्वास नांदेकर, संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, बुलढाणाचे सह संपर्कप्रमुख छगन मेहत्रे, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, अमरावती संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, राजेंद्र गायकवाड, श्याम देशमुख, मनोज कडू, शहरप्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. लाेकसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनमत शिवसेनेच्या साेबत असल्याचे अधाेरेखित झाले असल्याचे स्पष्ट करीत विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागा. यश मिळविण्यासाठी आपसातील मनभेद व मतभेद विसरा, प्रखर हिंदुत्वाचा विचार ज्वलंत ठेवण्यासाठी कामाला लागण्याचे खा.सावंत यांनी स्पष्ट केले. .................................तीन जिल्ह्यांचा घेतला आढावा!खा. अरविंद सावंत यांनी साेमवारी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय कामगिरीचा आढावा घेतला. प्रमुख पदाधिकाऱ्यांसाेबत संवाद साधत निवडणुकीच्या रणनितीवर मंथन केले. यावेळी संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. मतदार संघात कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो? उमेदवारांची जमेची बाजू, बलस्थाने, संघटनात्मक बांधणी, कार्य करण्याच्या पध्दतीचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी अकाेला व वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला जाइल.

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंत