शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रित करण्यास प्राधान्य;  विकास कामांच्या निधी खर्चाची काळजी! - डॉ. सुभाष पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:10 IST

उपलब्ध निधी विहित वेळेत खर्च करण्याची काळजी घेण्यात येत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुभाष पवार यांनी शनिवारी ‘लोकमत’ बोलताना दिली.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, सद्यस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रित करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येत असून, ग्रामीण भागासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना आणि विकास कामांचा निधी यापुढे शासनाकडे परत जाणार नाही, त्यासाठी उपलब्ध निधी विहित वेळेत खर्च करण्याची काळजी घेण्यात येत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुभाष पवार यांनी शनिवारी ‘लोकमत’ बोलताना दिली.जिल्हा परिषद प्रशासनासमोर सद्यस्थितीत महत्त्वाचे आव्हान कोणते?जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करणे, हेच सध्या जिल्हा परिषद प्रशासनासमोर महत्त्वाचे आव्हान आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गावागावांत आरोग्य सर्वेक्षण, रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट व इतर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून, कोरोना संसर्ग नियंत्रित करण्याच्या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच गावपातळीवर ग्रामपंचायतींकडे चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेला निधीही उपलब्ध आहे.ग्रामीण भागातील महिलांच्या दृष्टीने कोणत्या संकल्पनेवर भर दिला जात आहे?जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४८ टक्के गरोदर महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यानुषंगाने गरोदर महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे कमी होणारे प्रमाण थांबविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच अ‍ॅनिमियामुक्त गरोदर महिला जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या संकल्पनेवर जिल्हा परिषदमार्फत विशेष भर देण्यात येत आहे.विकासकामांचा निधी अखर्चित राहू नये यासाठी काय नियोजन आहे?जिल्हा परिषदेचा अखर्चित १४९ कोटी रुपयांचा शासनाकडे परत करावा लागला. त्यामध्ये विविध योजनांचा १२५ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहणार नाही, शासनाकडे परत जाणार नाही, यासंदर्भात काळजी घेण्यात येत आहे. विविध विकासकामे व योजनांसाठी उपलब्ध निधी विहित वेळेत खर्च करून विकासकामे मार्गी लावण्याचे नियोजन आतापासूनच करण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणांना गतिमान करण्यात आले असून, विकास कामांच्या ‘वर्क आॅर्डर’ देण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरू होणार आहे. कोरोना नियंत्रित करण्यास प्राधान्य; विकास कामांच्या निधी खर्चाची काळजीविकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेत समन्वय आहे का?जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी-सदस्य आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ग्रामीण भागात विकास कामे करण्यात येत आहेत. एखाद्या मुद्यावर निर्माण झालेले मतभेद चर्चेतून दूर केल्यानंतर विकास कामांसोबतच लोकशाही प्रक्रिया गतिमान होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदinterviewमुलाखत