शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 09:56 IST

अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा सुरू होणार असल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली.

अकोला : अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा सुरू होणार असल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली. अकोल्यातील वातानुकूलित प्रतीक्षालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते आले होते. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यातील विकासासंदर्भात गुप्ता यांना विचारणा केली असता, त्यांनी ही प्री-पेड सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली. या सेवेसोबतच दोन लिफ्ट आणि स्वयंचलित पायरीच्या जिन्यासोबतच रेल्वेस्थानकावर सौंदर्यीकरणाच्या अनेक सुविधा लवकरच येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवरील वातानुकूलित प्रतीक्षालयाच्या लोकार्पणासाठी गुप्ता आले होते. अकोल्यातील स्वच्छतेच्या समस्येबाबतचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. रेल्वेस्थानकावरील दुचाकी आणि चारचाकी पार्किंगची व्यवस्था पुन्हा विस्कळीत झाल्याची कबुली डीआरएम यांनी देत यामध्ये लवकरच सुधारणा होणार असल्याचे सांगितले.स्टेशन परिसरात आणि स्टेशनच्या बाहेरच्या परिसरात जातीने लक्ष देण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी येथे दिले. नवीन फूट ओव्हर ब्रीजजवळ पार्किंगची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी येथे केली. मध्य रेल्वे लाइनला दक्षिण मध्य रेल्वे लाइनने जोडण्यासोबतच सर्व सुविधा राहणार असल्याची माहितीदेखील गुप्ता यांनी दिली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, वसंत बाछुका, अशोक गुप्ता, राजकुमार बिलाला व अ‍ॅड. सुभाष ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. स्वच्छता आणि अनधिकृत वेडिंगप्रकरणी पदाधिकाऱ्यांनी डीआरएम यांना घेरले होते. दोन्ही बाबींकडे लक्ष देऊन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी गुप्ता यांनी दिले. दरम्यान, डीआरएम गुप्ता यांनी भुसावळ विभागातील सर्व विभागातील प्रमुखांची झाडाझडती घेत कानउघाडणी केली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक