शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वहंगामी बीटी कापूस बियाणे १५ मे नंतर मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 14:54 IST

जिल्ह्यात बीटी कापसाचे बियाणे पुरवठा १५ मेनंतरच करण्याची तयारी आहे. पेरणीच्या काळात बाजारात बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना त्याची पेरणी करता येणार नाही.

ठळक मुद्दे यावर्षी १ लाख २० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी २७०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. २६९५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा खासगी कंपन्यांकडून होणार आहे.

अकोला : बोंडअळीच्या हल्ल्याने गारद होणारे कापसाचे पीक वाचविण्यासाठीचा प्रयत्न म्हणून यावर्षी पूर्वहंगामी कापसाची पेरणी होऊच द्यायची नाही, असे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यात बीटी कापसाचे बियाणे पुरवठा १५ मेनंतरच करण्याची तयारी आहे. पेरणीच्या काळात बाजारात बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना त्याची पेरणी करता येणार नाही.पश्चिम विदर्भात महत्त्वाचे पीक असलेल्या कापूस पिकाला गेल्यावर्षी बोंडअळीने चांगलाच हिसका दाखविला. विशेष म्हणजे, बीटी कापूस बियाणे असतानाही पिकावर बोंडअळीचा हल्ला झाला, ही बाब त्यापेक्षाही भयंकर घडली. या प्रकाराने सर्वच कापूस उत्पादक शेतकरी गर्भगळीत झाले. शासनाने बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस पिकाला मदत देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात बोंडअळीचा हल्ला रोखणे, कीटकनाशकांचा वाजवी वापर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. त्यानुसार प्रत्येक टप्प्यावर खबरदारी घेण्याचा पवित्रा शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे.पूर्वहंगामी कापूस पिकाची पेरणी केल्यास किडींच्या जीवनचक्रानुसार या पिकावर त्यांचे पोषण होण्याएवढा काळ उपलब्ध होतो. त्या पोषक काळात त्यांचा टिकाव लागल्यास पुढील काळात पेरणी झाल्यास इतर पिकांवर हल्ला करण्यास कीड सक्षम होते. त्या किडीचे जीवनचक्र बाधित करण्यासाठी कापसाची पूर्वहंगामी पेरणी रोखणे आवश्यक असल्याचा उपाय शासनाकडून केला जात आहे. पावसाच्या पाण्यावर उगवलेल्या पिकांमध्ये किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी असते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यानुसार सिंचनाच्या पाण्यावर कापूस पिकाची पेरणी रोखली जात आहे. त्यासाठी दरवर्षी बीटी कापूस बियाणे १५ मेपर्यंत बाजारात बियाणे उपलब्ध केले जाते. यावर्षी ते मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकºयांना पूर्वहंगामी पेरणीसाठी आवश्यक काळात बियाणे बाजाराबाहेर ठेवले जाणार आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात कापसाची पेरणी १ लाख ४२ हजार ४८२ हेक्टरवर झाली होती. यावर्षी ती १ लाख २० हजार हेक्टरवर होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी २७०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी २६९५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा खासगी कंपन्यांकडून होणार आहे. गुलाबी बोंडअळीच्या परिणामाने ही घट होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीcottonकापूस