शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पीआरसीने फोडला घाम!

By admin | Updated: June 3, 2017 02:03 IST

बार्शीटाकळी येथील प्रकार : प्रश्नावलीतील पूर्ण प्रश्नांचे मिळाले अर्धेच उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी/ सायखेड: गेल्या दोन महिन्यांपासून पीआरसीचा धसका घेऊन आपल्या शासकीय जबाबदारीची जाणीव ठेवत सर्व रेकॉर्ड ‘अपडेट’ ठेवूनही अखेर पीआरसीने प्रश्नावाली सूचीनुसार पंचायत व्यवस्थेचा आढावा घेताना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना पं. स. व जि. प. च्या अधिकाऱ्यांना घाम फोडल्याचा अनुभव २ जून रोजी बार्शीटाकळी येथे आला.विविध योजना, त्यावरील खर्च यासह शिक्षण, लघुसिंचन आदी विभागाचा लेखाजोखा घेताना पंचायतराज समितीचे प्रमुख आ. रामहरी रूपनवर यांनी प्रशासन अधिकाऱ्यांची चांगलीच परेड घेतली. पं. स. सभागृहातील बंद खोलीत तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या या आढावा बैठकीमध्ये विविध प्रश्नांची उत्तरे देताना ‘होय सर, नाही सर, रेकॉर्ड उपलब्ध करून देतो सर’ हेच शब्द वारंवार ऐकायला मिळाले. अन्यथा बीडीओंना जबाबदार धरूशासनाचे कर्मचारी म्हणून काम करीत असताना पं. स. स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेतील निधीमध्ये जर अपहार झाल्याचे सिद्ध झाल्यास अशा कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून अपहारातील रक्कम वसूल केली जाते. असे गैरव्यवहार करून शासनाचे पैसे बिनव्याजी वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तीन महिन्यात अपहारातील व लेखा परीक्षणादरम्यान आढळलेल्या फरकाची रक्कम वसूल करा. अन्यथा बीडीओंना जबाबदार धरू, असे समितीप्रमुखांनी निर्देशित केले.स्वत:ची मुले इंग्रजी शाळेत अन् गरिबाच्या मुलांचे काय?पीआरसीने शिक्षणविषयक आढावा घेतला असता विद्यार्थी पटसंख्येत होत असलेल्या चढ-उताराला शिक्षक जबाबदार आहेत. स्वत:ची मुले इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, तर दुसऱ्यांची मुले जि. प. च्या शाळेत शिकतात. त्यांना धड इंग्रजी व गणिताचे पाढे बरोबर येत नाहीत. ही सुधारणा शिक्षकाने काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे समिती प्रमुखांनी सुचविले. तालुक्यातील १३६ पैकी ५५ जि. प. शाळा डिजिटल झाल्याची माहिती घेताना पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना मिळालेले आयएसओ मानांकन व डिजिटल झालेल्या अंगणवाड्या याचा आदर्श समोर ठेवून काम करण्याचे सुचविले.धाबा ग्रामपंचायतीला भेट पीआरसीची बार्शीटाकळी पं. स. मधील आढावा व तपासणी बैठक संपन्न झाल्यावर समितीने २१ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आदर्श गाव धाबा ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान सुसज्ज इमारत पाहून आश्चर्यचकीत झालेले समितीप्रमुख आ. रामहरी रुपनवर यांनी मौखिक आयएसओ मानांकित असल्याचे मत मांडले. ग्रा. पं. च्या कामकाजाबाबत उत्पन्न वाढीबाबत व संगणकीकृत प्रणालीबाबत माहिती ग्रामविकास विभाग सचिवाने घेतली. शेरा बुकमध्ये भेटीची नोंद करताना धाबा ग्रा. पं. चे कार्यालय अतिशय सुंदर असून, माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या प्रयत्नातून हे साकार झाले आहे, असे पथक प्रमुखांनी म्हटले आहे. यांचा होता समावेश या पथकामध्ये अध्यक्ष आ. रामहरी गोविंदराव रूपनवार, सदस्य आ. रवींद्र वामनराव नजरधने, आ. कृष्णा धमाजी गजबे, ग्रामविकास उपसचिव ना. भा. रिंगणे, मुख्य लेखा वित्त अधिकारी गीता नागर, प्रतिवेचक प्रकाश गागरे, कार्यकारी अभियंता देशमुख, शिक्षण अधिकारी प्रकाश मुकुंद, डॉ. के. व्ही. मेहरे, एस. एन. कुळकर्णी आदींचा समावेश होता. गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, विविध विभागाचे प्रमुख तथा तत्कालीन गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, कान्हेरी सरपची तपासणी केली.