शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

 कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 16:23 IST

दिग्रस बु. : (अकोला) : पाण्याच्या शोधार्थ कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला आलेगाव वनविभागाच्या कर्मचाºयांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवदान दिले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्या अंतर्गत येणाºया हिंगणा येथील शेतशिवारात सोमवारी  दुपारी पाण्याच्या शोधात आलेला एक कोल्हा  कोरड्या विहिरीत पडला. पंजााबराव उजाडे यांच्या शेतातील विहिरीत ...

ठळक मुद्देपातुर तालुक्यातील हिंगणा येथील घटना.वनविभागाच्या कर्मचाºयांनी दोरांच्या सहाय्याने काढले कोल्ह्याला बाहेर.बाहेर पडताच कोल्ह्याने जंगलात धुम ठोकली.

दिग्रस बु. : (अकोला) : पाण्याच्या शोधार्थ कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला आलेगाव वनविभागाच्या कर्मचाºयांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवदान दिले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्या अंतर्गत येणाºया हिंगणा येथील शेतशिवारात सोमवारी  दुपारी पाण्याच्या शोधात आलेला एक कोल्हा  कोरड्या विहिरीत पडला. पंजााबराव उजाडे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याने जीवाच्या आकांताने ओरडणे सुरु केल्यावर काही ग्रामस्थांना त्याचा आवाज ऐकू आला. ही वार्ता पसरताच गावकºयांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यांनी कोल्ह्याला विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी आलेगाव वनविभागाचे कर्मचाºयांना पाचारण केले. वनपरिक्षेत्र अधिकारी देशमुख, कर्मचारी अविनाश घुगे, गजानन काढोले, प्राणीमित्र मुन्ना शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोल्ह्याला दोरांच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढले. हा प्रकार दोन-अडीच तास सुरु होता. बाहेर पडताच कोल्ह्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. यावेळी वैभव उजाडे, नितीन सोनोने, गणेश उजाडे, प्रजवल  बरडे, विरु इंगळे, आकाश आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणforest departmentवनविभाग