शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

महाविकास आघाडीने जागा वाटपाचा समझोता जाहीर करावा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

By संतोष येलकर | Updated: February 23, 2024 19:34 IST

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तीनही पक्षांनी त्यांच्यात झालेल्या राज्यातील जागा वाटपाचा समझोता जाहीर करुन, त्यामध्ये आमच्या पक्षाच्या जागा कोणत्या पक्षाच्या कोट्यात गेल्या, याबाबतची माहिती दोन दिवसांत लेखी स्वरुपात किंवा माध्यमांद्वारे द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिली. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडीतील संबंधित तीन प्रमुख पक्षांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जागांचा समझोता झाला, याबाबतची भूमिका तीनही पक्षांनी जाहीर करावी तसेच समझोत्यानुसार कोणत्या जागा कोणत्या पक्षाच्या कोट्यात गेल्या, याबाबतची माहिती आम्हाला लेखी स्वरुपात द्यावी किंवा माध्यमांव्दारे दिली तरी चालेल, असे अॅड.आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अॅड.नरेंद्र बेलसरे, विकास सदांशिव, पराग गवइ, सिध्दार्थ सावदेकर आदी उपस्थित होते.

तिघांचे जागा वाटप ठरल्यावर आम्ही वाटाघाटी करु !महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे जागा वाटप ठरल्यानंतर आणि कोणता पक्ष कोणकोणत्या जागा लढविणार हे कळल्यानंतर आम्ही आमच्या जागांसंदर्भात वैयक्तिकरित्या तीन पक्षांसोबत वाटाघाटी करुन जागांची मागणी करणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मसुदा काँग्रेसने स्वीकारला; त्यांचाही मसुदा शेअर करावा !वंचित बहुजन आघाडीचा ३९ मुद्दयांचा मसुदा स्वीकारल्याचे काँग्रेसचे नेत चेन्नीथला यांनी जाहीर केले. आमचा मसुदा महाविकास आघाडीने मान्य केला असून, आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांनीही त्यांचा मसुदा आम्हाला शेअर करावा, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर