शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 13:46 IST

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून महिनाभरातच फेरनियुक्त्या करण्यात आल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्ष, युवा आघाडी महानगर अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांनी पक्ष सदस्यत्व व पदाचा राजीनामा देत असल्याचे बुधवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

ठळक मुद्देप्रशांत भारसाकळ, सुहास साबे यांच्यासह १६ जणांची पक्षाला सोडचिठ्ठी अडीचशे कार्यकर्ते सोबत असल्याचा दावाराजीनामा संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना टपालद्वारे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून महिनाभरातच फेरनियुक्त्या करण्यात आल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्ष, युवा आघाडी महानगर अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांनी पक्ष सदस्यत्व व पदाचा राजीनामा देत असल्याचे बुधवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुहास साबे यांना अकोला जिल्हा युवक आघाडी प्रमुख पदावरून युवा आघाडी महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या समर्थनार्थ इतर पदाधिकाºयांनी राजीनामा देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आपल्यासोबत अडीचशेपेक्षा अधिक कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. राजीनामा संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना टपालद्वारे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.प्रहार जनशक्ती पक्षाची अकोला जिल्हा कार्यकारिणी २ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सुहास साबे यांना जिल्हा युवक आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीत पक्षांतर्गत घडामोडी झाल्या. ३० जानेवारी रोजी संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रात अकोला जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यामध्ये सुहास साबे यांना जिल्हा युवक आघाडी प्रमुख पदाऐवजी अकोला युवा आघाडी महानगर अध्यक्ष करण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या सुहास साबे यांनी पक्ष सदस्यत्व व पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समर्थनार्थ महानगर अध्यक्ष प्रशांत भारसाकळ, महिला आघाडी महानगर अध्यक्ष नम्रता ठोकळ, विद्यार्थी आघाडी महानगर अध्यक्ष शुभम पिठलोड यांच्यासह ज्ञानेश्वर देशमुख, अमोल खोबरखेडे, शुभम गावंडे, बाळू पाटील ढोले, शुभम लहामगे, विक्की कांबे, संदीप तवर, श्रीकांत नकासकर, सविता शेळके, नंदु सारसार, उज्ज्वल तायडे व मो.अतिम यांनी बुधवारी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. वैयक्तिकरीत्या बच्चू कडू यांच्याशी सदैव जुळलेले राहणार असल्याचे यावेळी राजीनामा देणाºयांनी सांगितले.‘झुंज’ संघटनेचे पुनरुज्जीवन करणारप्रहार जनशक्ती पक्षात सामील होण्यापूर्वी आम्ही ‘झुंज’ या सामाजिक संघटनेद्वारे समाजकार्य करत होतो. आता प्रहारचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही पूर्वीप्रमाणे ‘झुंज’या संघटनेच्या छताखाली एकत्र येऊन समाजकार्य करतच राहू, असे सुहास साबे, प्रशांत भारसाकळ व इतर कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. ‘झुंज’ संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरPoliticsराजकारण