शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पातूरच्या नगराध्यक्षांच्या घरी वीज चोरी उघडकीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 10:47 IST

नगराध्यक्ष प्रभा कोथळकर यांच्या निवासस्थानी इलेक्ट्रिक मीटरसोबत छेडछाड करून विजेची चोरी होत असल्याची माहिती मिळाली.

पातूर: पातूर शहराच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीच्या वाशिम येथील भरारी पथकाने गुरुवारी दुपारी अचानक छापा टाकून,वीज मीटरमधून होणारी वीज चोरी पकडली.या प्रकरणात वीज चोरी कायदा कलम १३५ नुसार लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशिम येथील भरारी पथकाला पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा कोथळकर यांच्या निवासस्थानी इलेक्ट्रिक मीटरसोबत छेडछाड करून विजेची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने नगराध्यक्ष कोथळकर यांच्या निवासस्थानी छापा टाकून इलेक्ट्रिक वीज मीटरची तपासणी केली. तपासणी दरम्यान पथकासमोर वीज चोरी असल्याचे उघड झाले . नगराध्यक्षांच्या घरी नेमकी किती रुपयांची वीज चोरी झाली, याची माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, ही कारवाई अत्यंत गुप्तपणे करण्यात आली. महावितरण कंपनीने यासंदर्भातील तपशील सध्यातरी उघड केलेला नाही. महावितरणच्या भरारी पथकाने काही दिवसांपूर्वी एका ढाब्यावरसुद्धा कारवाई केली होती. (तालुका प्रतिनिधी)अधिकारी म्हणतात, कारवाई केली!महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना, नगराध्यक्षा कोथळकर यांच्या घरी केलेल्या कारवाईला दुजोरा दिला आहे; परंतु कारवाईची माहिती काही दिवसांतच प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.आम्ही लग्नाला गेलो होतो. कारवाईचा फोन आला; परंतु काय कारवाई झाली, याची माहिती नाही. कारवाई केल्याचा पंचनामा मिळालेला नाही. त्यामुळे यावर काही भाष्य करू शकत नाही.-प्रभा कोथळकर, नगराध्यक्ष पातूर नगर परिषद.

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणPaturपातूर