शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

महान जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: September 6, 2016 02:24 IST

खंडित वीजपूरवठय़ामुळे अकोला शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

अकोला, दि. ५: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा सोमवारी तब्बल चार वेळा खंडित झाला. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांमध्ये महावितरण कंपनीप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. अकोलेकरांना महान धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तत्पूर्वी तेथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतरच शहरातील जलकुंभापर्यंत पाणी पोहोचविल्या जाते. अ त्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेला पाणीपुरवठा सुरळीत राहणे अपेक्षित आहे. महान ते अकोला पर्यंतच्या मार्गावरील जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. यावेळी मात्र जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठय़ाचे वेळा पत्रक कोलमडण्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी सोमवारी जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा तब्बल चार वेळा खंडित झाल्याची बाब समोर आली. परिणामी महापालिकेला पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात अंशत: बदल करावा लागला आहे. एक्स्प्रेस फिडरचा फायदा काय? जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी एक्स्प्रेस फिडरची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असताना वीजपुरवठा खंडित होणे अपेक्षित नाही; मात्र ग्रामीण भागात विजेचा वा पर वाढल्याची सबब पुढे करीत जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठय़ावर परिणाम होत असल्याचा तर्कहीन मुद्दा महावितरण कंपनीकडून उपस्थित केला जात असल्याची माहिती आहे. या भागात सिंचनासाठी विजेचा वापर वाढत असला तरी एक्स्प्रेस फिडरमुळे जलशुद्धीकरण केंद्रावर त्याचा परिणाम होणे अपेक्षित नाही, हे तेवढेच खरे.