शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बिल न भरणाऱ्या १६७६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

या ग्राहकांकडे अनुक्रमे १ कोटी १० लाख, १९.२६ लाख आणि १०.५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. कारवाईमुळे खंडित झालेला वीजपुरवठा ...

या ग्राहकांकडे अनुक्रमे १ कोटी १० लाख, १९.२६ लाख आणि १०.५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. कारवाईमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज ग्राहकांना थकबाकीसह पुनर्जोडणी चार्जेसचा शिलकीचा दंड भरावा लागणार आहे.

कोरोनाकाळात वसुलीपेक्षा महावितरणने सेवेला प्राधान्य देत अखंडित वीजपुरवठा केला. परंतु या काळात अपवादात्मक ग्राहक वगळता वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने महावितरणसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. महावितरणसमोर आता वसुलीशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ३० जूनपर्यंत ४३२ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणने कारवाईच्या मोहिमेला अधिक गती दिली आहे.

अकोला परिमंडळांतर्गत विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून ४३२ कोटी थकीत देयके वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना परिमंडळात १ लाख ४१ हजार ३२० असे घरगुती ग्राहक आहेत त्यांच्याकडे प्रत्येकी ५ हजार आणि त्यापेक्षा जास्त रुपयांची थकबाकी आहे. हीच संख्या वाणिज्यिक ग्राहकांची १८,२३६ आणि औद्योगिक ग्राहकांची संख्या ५०२८ आहे. त्यांच्याकडे अनुक्रमे १६२ कोटी, २९ कोटी आणि २४ कोटी रुपयांची वीज देयकांची थकबाकी आहे.

जिल्हानिहाय थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांमध्ये सर्वात जास्त म्हणजे ६८ हजार घरगुती ग्राहक हे बुलडाणा जिल्ह्याचे असून त्यांच्याकडे प्रत्येकी ५ हजार आणि त्यापेक्षा जास्त रुपये असे एकूण ७४ कोटी ७१ लाख वीज देयकाचे थकीत आहेत. तर वाणिज्यिक ग्राहकांची संख्या ही ७८२१ असून त्यांच्याकडे १२ कोटी थकले आहेत. औद्योगिक थकबाकीदारांची संख्या ही २३०० असून थकबाकी ही ९ कोटी ४० लाख आहे. अकोला जिल्ह्यात ५२,५०० घरगुती ग्राहकांकडे ६२ कोटींची वीज देयके थकली आहेत. ७२२० वाणिज्यिक ग्राहकांकडे १२ कोटींची वीज देयके थकली आहेत तर १७५२ औद्योगिक ग्राहकांकडे ७ कोटी ८२ लाख वीज देयकाचे थकले आहे. हीच संख्या वाशिम जिल्ह्यातील २० हजार ७३० घरगुती ग्राहकांकडे २५.२० कोटी, ३२०० वाणिज्यिक ग्राहकांकडे ५.३२ कोटी आणि औद्योगिक वर्गवारीतील ९८० ग्राहकांकडे ६.७४ लाख वीज देयकाचे थकीत आहेत.

वीज ग्राहक वीजबिल भरण्याला प्रतिसाद देत नसतील तर महावितरणला नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे. खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्राहकांना रिकनेक्शन चार्जेस वेगळे भरावे लागणार असल्याने महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत देयकांचा भरणा करून सहकार्य करावे.

- अनिल डोये, मुख्य अभियंता,

महावितरण अकोला परिमंडळ