शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅसवर अकोल्यात वीज निर्मिती प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:33 IST

या प्रकल्पातून दररोज २४ युनिट वीज निर्मिती होत असल्याने विजेच्या बाबतीत हा विभाग स्वयंपूर्ण झाला आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान विकसित केले असून, या बायोगॅसपासून कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागात वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून दररोज २४ युनिट वीज निर्मिती होत असल्याने विजेच्या बाबतीत हा विभाग स्वयंपूर्ण झाला आहे.डॉ. पंदेकृविच्या नवीन तंत्रज्ञानातून ३० टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे. गॅस सिलिंडर व रॉकेलला सक्षम पर्याय असलेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारावर या कृषी विद्यापीठाने भर दिला असून, विविध प्रकारच्या जैववायू मॉडेल्सचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. कौटुंबिक पद्धतीने उभारलेल्या जैववायू सयंत्रामध्ये गायी, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांच्या शेणाचा वापर करण्यात येतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जैववायू सयंत्रामध्ये ओले शेण पाचन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने हे सयंत्र वर्षभर कार्यरत राहून जैववायू, विजेची गरज पूर्ण करण्याचे काम करीत आहे. या सयंत्राचे डिझाइन, मूल्यांकन, तंत्रज्ञान, कुशलता आदींचे यशस्वी परीक्षण या कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने केले आहे.

५० घनमीटरचे जनता बायोगॅसडॉ. पंदेकृविच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांतर्गत राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून येथील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या प्रक्षेत्रावर ५० घनमीटरचे सुधारित जनता बायोगॅस सयंत्र बांधण्यात आले आहे. यात दररोज एक हजार किलो शेण वापरण्यात येत आहे. याला सहा किलो वॉटचे इंजीन आणि जनिंत्र लावण्यात आले आहे. याला आठ घनमीटर गॅस लागतो. पाच तास हे इंजीन चालते. प्रति तास सहा युनिट वीज यातून निर्माण होत असून, ही वीज गुराचे गोठे व या परिसरात वापरण्यात येत आहे. तीन एचपी पाण्याची मशीनही या बायोगॅसवर चालते. 

 या सुधारित सयंत्राचा धारणाकाळ सामान्य सयंत्रापेक्षा जास्त असल्यामुळे जैववायू उत्पादनात वाढ झाली आहे. या पाचीत मळी बाहेर येण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. सध्या दिवसाला २४ युनिट वीज निर्मिती होत आहे. कृषी विद्यापीठात हा पथदर्शक प्रकल्प असून, शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. यातील शेण नंतर सेंद्रिय शेतीसाठी खत म्हणूनही वापरता येते.- डॉ. सुरेंद्र काळबांडे,विभाग प्रमुख,अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी,डॉ.पंदेकृवि,अकोला.फोटो -

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ