शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

वीज वितरणचे पिंजर येथील कार्यालय शिकस्त

By admin | Updated: May 13, 2014 19:17 IST

खिडक्या, काचा गायब, कोट्यवधींची संपत्ती बेवारस

पिंजर: वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयाची इमारत अतिशय शिकस्त झाली आहे. इमारतीच्या दरवाजाला भगदाड पडले असून, खिडक्यांच्या काचाही गायब आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची संपत्ती बेवारस असल्याचे दिसते. पिंजर येथे वीज वितरण कं पनीचे ३३ के.व्ही. कें द्र असून, या केंद्रातून पिंजर परिसरातील ४३ खेडेगावांत वीज पुरवठा केला जातो. या ४३ गावांतील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी येथे कार्यरत असलेल्या १५ कर्मचार्‍यांसाठी कार्यालयही बांधण्यात आले आहे. कार्यालयाची ही इमारत शिकस्त झाली असून, कधी पडेल सांगताच येत नाही. इमारतीचे दरवाजे तुटले असून, त्यांना जाड पृष्ठे लावून झाकण्यात आले आहे. खिडक्यांच्या काचा फु टल्या असून, तेथेही कागदी पृष्ठे लावण्यात आली आहेत. कार्यालयात येणार्‍या ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. हे कार्यालय गावाबाहेर आहे. त्यातच त्याची अवस्था मोडकळीस आल्याने रात्रीच्या वेळी तेथे सुरक्षारक्षकांची संख्या अधिक असायला हवी; परंतु ती काळजीही घेतल्याचे दिसत नाही. येथील कनिष्ठ अभियंता मुख्यालयीच हजर राहत नसल्याने त्यांचा कर्मचार्‍यांवर वचक राहिला नाही. या वीज केंद्रावरील ४३ खेडेगांवासाठी येथे ११ लाईलमन, २ यंत्र चालक, १ कनिष्ठ अभियंता आणि रात्रीच्या वेळी गस्तीसाठी दोन चौकीदार आहेत. रात्रीच्या वेळी या कार्यालयात केवळ एक ऑपरेटर आणि एकच चौकीदार हजर असतो. कार्यालची इमारत शिकस्त असतानाच कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे वीजग्राहकांच्या समस्या लवकर निकाली लागत नाहीत, असे असले तरी, वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना मात्र त्याचे काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसते. या कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करून ग्राहकांच्या समस्या त्वरित निकाली काढण्यासाठी कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, अशी मागणी परिसरातील वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे.