शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

अकोटातील दुकानदारांना अतिरिक्त धान्य वाटपाची शक्यता

By admin | Updated: July 17, 2017 03:17 IST

काळाबाजार करण्यासाठी गोदामातून सातत्याने धान्य गायब

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय धान्य वाटपासाठी साठा केलेल्या अकोटच्या गोदामातून गहू आणि तांदळाचा काळाबाजार करण्यासाठी दुकानदारांनाच अतिरिक्त धान्य वाटप केल्याची शक्यता मोजणीदरम्यान व्यक्त झाली. त्यामुळे गोदामपालाने गेल्या काही दिवसात वाटप केलेल्या धान्याच्या नोंदीची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीत दुकानदारांना मंजुरीपेक्षा अतिरिक्त धान्य वाटप केल्याचे पुरावे मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या प्रकरणात गोदामपाल मंगेश मेश्राम यांच्यावरच कारवाईचा फास आवळल्या जाण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच गोदामांची तपासणी करण्याचा आदेश प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी दिला. त्यानुसार तालुका स्तरावर असलेल्या गोदामांची चौकशी तहसीलदारांनी केली. अकोटच्या गोदामाची चौकशी करताना तहसीलदार विश्वनाथ घुगे यांना मोजणीमध्ये १४० क्विंटलपर्यंत गहू आणि ४५ क्विंटलच्या जवळपास तांदळाचा साठा कमी आढळून आला. त्यांचा अहवाल शनिवारी सायंकाळीच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना सादर करण्यात आला. दरम्यान, तहसीलदार घुगे यांनी धान्याच्या साठा तपासणीत ही बाब उघड झाली. गोदामात शनिवारपर्यंतच्या नोंदीनुसार उपलब्धतेपेक्षा साठा कमी आढळण्याची कारणे काय, याचा शोध घेण्यासाठी त्यांनी चौकशी सुरू केली. गोदामातील धान्य नेमके कोठे गेले, याचा शोध नव्याने घेतला जात आहे. त्याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार गोदामपाल मंगेश मेश्राम यांनी तालुक्यातील काही दुकानदारांना दर महिन्यात अधिकचे धान्य वाटप केल्याची चर्चा आहे. अन्नधान्य वितरण विभागाचे निरीक्षण अधिकारी, तहसीलदार यांनी दुकानदारांना दरमहा किती धान्य मंजूर केले, त्या तुलनेत गोदामातून त्यांना किती देण्यात आले, या बाबींचा शोध घेतला जात आहे. गोदामातून दुकानदारांना वाटप केल्याच्या नोंदी कागदत्रावर बरोबर असतील, अतिरिक्त दिलेल्या धान्याची नोंद होण्याची शक्यता कमीच आहे. त्याचवेळी गोदामातील साठा कमी होण्याची जबाबदारी गोदामपालाची असल्याने कारवाईचा फास मंगेश मेश्राम यांच्या गळ््यात अडकणार, एवढे निश्चित आहे. कारवाईचा प्रस्ताव आज सादर होण्याची शक्यतातपासणीचा अहवाल शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानुसार आता पुढील कारवाईसाठी पुरवठा विभागाचा प्रस्ताव उद्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होण्याची शक्यता आहे.