शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील रस्ते कामांचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:08 IST

‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांतील गुणवत्ता तपासणीचे काम रविवार, २२ जुलैपासून सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे काँक्रिटीकरण झालेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येत आहे.तीन पथकाद्वारे रविवारी तीन रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले. शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्तेचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू करण्यात आले आहे.

अकोला : शासन निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते वर्षभरातच खराब झाल्याने, रस्ते कामांत अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँक्रिटीकरण झालेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येत आहे. त्यामध्ये रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या तीन पथकाद्वारे रविवारी तीन रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले. त्यामुळे शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्तेचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू करण्यात आले आहे.शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्ते कामांची पाहणी केली असता, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्ते कामात प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ जुलै रोजी काढले. त्यानुसार ‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांतील गुणवत्ता तपासणीचे काम रविवार, २२ जुलैपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अकोला उप विभागाच्या गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी आणि अमरावती व अकोल्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या तीन पथकांकडून रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी (रविवारी ) संबंधित तज्ज्ञांच्या तीन पथकांमार्फत तीन रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले असून, सोमवारी शहरातील इतर रस्ते कामांचेही नमुने घेण्यात येणार आहेत. रस्ते कामांच्या तपासणीत नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याने, शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्तेचे ‘पोस्टमार्टेम’ सुरू झाले आहे. या गुणवत्ता तपासणीत रस्ते कामांतील ‘पोलखोल’ होणार आहे.‘या’ पथकांकडून घेण्यात येत आहेत नमुने!-अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी.- गुणनियंत्रण, जलसंपदा उप विभाग, अकोला आणि शिपला इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी.- गुणनियंत्रण, सार्वजनिक बांधकाम उप विभाग अकोला आणि श्री शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी.‘या’ तीन रस्ते कामांचे घेतले १० नमुने!-मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक -टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक  -अग्रसेन चौक ते दुर्गा चौक  राष्ट्रीय महामार्गाच्या यंत्रणांनी दिल्या ‘कोरकटर ’मशीन!शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीत नमुने काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची कामे करणाºया यंत्रणांनी ‘कोरकटर’मशीन उपलब्ध करुन दिल्या. त्यामध्ये बीसीसी कंपनी, स्कायलार्क कंपनी, ओरिएंटल कंपनी व साठे इन्फ्रा कंपनीमार्फत कोरकटर मशीन उपलब्ध करून दिल्या.नमुना काढताना मशीन घसरलीअग्रसेन चौक ते दुर्गा चौक या रस्त्यावर कामाचा नमुना काढण्यासाठी ‘कोरकटर ’मशीन सुरू करण्यात आली; मात्र काही वेळातच मशीन घसरली. त्यामुळे दोघांना दुखापत झाली. त्यामध्ये स्कायलार्क कंपनीचे व्यवस्थापक सुधीर अकर्ते यांच्या खांद्याला मार लागला तर त्यांच्यासोबत असलेल्या एका जणाच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. दोघांनाही तातडीने एका खासगी रुग्णालयात रुग्णालयात भरती करण्यात आले.मंगळवारपर्यंत घेणार नमुने!शहरातील रस्ते कामांच्या तपासणीत तीन दिवस रस्ते कामांचे नमुने पथकांमार्फत घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये रविवारी तीन रस्त्यांचे नमुने घेण्यात आले असून, सोमवारी अशोक वाटिका चौक ते सरकारी बगिचा, मानेक टॉकीज ते मोहता मिल चौक, श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड पोलीस चौकीपर्यंत रस्ते कामांचे नमुने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नमुने घेण्याचे काम मंगळवारपर्यंत चालणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkola cityअकोला शहरAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय