शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींचे फलक कायमच; मनपासह भाजप कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:18 IST

शहरातील काही भागात लोकप्रतिनिधींचे फलक अद्यापही कायमच उघडे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अकोला: विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाचे फलक, बोर्ड काढून घेण्यासोबतच काही फलक झाकण्याची कार्यवाही केली होती. यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना आवाहन करीत असे फलक किंवा बोर्ड झाकण्याचे निर्देश दिले होते. तरीही शहरातील काही भागात लोकप्रतिनिधींचे फलक अद्यापही कायमच उघडे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मनपासह भाजप कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष अंगलट येण्याची चिन्ह आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मतदारांवर प्रभाव निर्माण करतील, असे कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक, पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाचे फलक काढून घेण्याचे अथवा ते झाकून ठेवणे अपेक्षित आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने कार्यवाही करण्याची गरज आहे. २१ सप्टेंबर रोजी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रात्री व दुसºया दिवशी असे फलक काढणे अथवा झाकून ठेवण्याची कार्यवाही पार पाडली. दहा दिवस उलटून गेल्यावरही शहरातील काही भागात लोकप्रतिनिधींच्या विकास कामांचे फलक, बोर्ड कायमच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हा प्रकार पाहता मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांना विसर?शहराच्या कानाकोपºयात, गल्लीबोळात भाजपच्या विकास कामांचे फलक आहेत. अर्थातच, याची संबंधित प्रभागाचे नगरसेवक, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांसह मंडळ अध्यक्षांना पूर्ण जाणीव आहे. मध्यंतरी असे फलक काढून घेण्यासंदर्भात भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहनसुद्धा केले होते. या आवाहनाचा कार्यकर्त्यांना विसर पडला की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका