शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

खासदार धोत्रे बाहेरगावी असल्याने समेटाचे अंदाज कोलमडले!

By atul.jaiswal | Updated: March 3, 2018 16:56 IST

अकोला : खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भाजप नेत्यांची मांदियाळी.खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही.उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.

 

अकोला : बुलडाणा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद मार्गे ठरलेल्या नियोजित दौºयात बदल करून अकोला मार्गे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अकोला विमानतळावर ते गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे यांच्यात समेट घडवून आणतील अशी अटकळ  बांधली जात होती.  परंतु, खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील बदलाबाबत व्यक्त करण्यात येत असलेले राजकीय अंदाज सपशेल कोलमडले, दरम्यान, उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यातील कुरघोडीचे राजकारण जिल्ह्यासाठी नवीन नाही. काल-परवापर्यंत एक सीमारेषेपर्यंत मर्यादीत असलेली या दोन्ही नेत्यांमधील धूसफूस गुरुवारी डॉ. पाटील यांचे गाव असलेल्या घुंगशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील वादाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली. डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा १५ दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवाणीर्चा इशारा  खासदार संजय धोत्रे यांनी दिला होता. होळीच्या एक दिवस घडलेल्या या राजकीय धुळवडीने या दोन नेत्यांमधील वादाचे विविध रंग समोर आले. या प्रकाराने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दोन बड्या नेत्यांमधील संघर्षामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊन त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभय नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे ठरविले होते. शनिवारी बुलडाणा येथे भारतीय जैन संघटनेच्या महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियानाच्या उद्घाटनसाठी जाण्याकरीता औरंगाबाद मार्गे न जाता अकोला मार्गे जाऊन विमानतळावर खासदार संजय धोत्रे व डॉ. रणजीत पाटील यांच्याशी चर्चा करून दोघांमध्ये समेट घडवून आणावी, अशी मुख्यमंत्र्यांची योजना असून, त्यासाठीच त्यांनी दौºयात बदल करून घेतला होता, असे भाजपच्या अंतस्थ सूत्रांकडून समजले होते. शनिवारी, मुख्यमंत्र्यांचे विमान अकोला विमानतळावर उतरले त्यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवर उपस्थित होते. या नेत्यांच्या स्वागतासाठी अकोल्यातील भाजपचे झाडून सारेच नेते व पदाधिकारी उपस्थित राहिले. डॉ. रणजीत पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, उप महापौर वैशाली शेळके, माजी महापौर उज्ज्वला देशमुख, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, नगरसेवक गोपी ठाकरे,  जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय, उपविभागीय अधिकार प्रा. संजय खडसे आदींची उपस्थिती होती. यावेळी भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार संजय धोत्रे हे मात्र कौटुंबिक कार्यक्रमामुळे जिल्ह्याबाहेर गेलेले असल्याने, ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे डॉ. रणजित पाटील व संजय धोत्रे यांच्यात समेट घडवून आणण्याची मुख्यमंत्र्यांची योजना निष्फळ ठरल्याची चर्चा अकोल्यातील राजकीय वर्तुळात दिवसभर होती.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Dhotreसंजय धोत्रेguardian ministerपालक मंत्री