शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पौर्णिमेनंतर कपाशीवर अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:30 IST

कपाशीवर यावेळी नवीन लष्करी अळीचा धोका वाढल्याने कृषी विभागाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

अकोला: अमावास्या, पौर्णिमेनंतर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढतो, असा समज आहे. काही अर्थाने हे खरेही ठरत असून, कपाशीवर यावेळी नवीन लष्करी अळीचा धोका वाढल्याने कृषी विभागाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात ठिकठिकाणी या अळीने मका पीक फस्त केले असून, मका पीक काढणीनंतर इतर पिकांकडे मोर्चा वळविला आहे. सोलापूर जिल्ह्यातून संपूर्ण राज्यात प्रवेश करणारी ही अळी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या सुसरे गावात कपाशीवर आढळून आली आहे. बहुभक्षीय ही अळी ८० पिकांवर उपजीविका करते. विदर्भात व या जिल्ह्यात सध्या तरी कपाशीवर ही अळी दिसली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोेहन वाघ यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.कपाशी पिकांवर प्रादुर्भाव आढळल्या शेतकºयांनी प्रथम प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.- काय उपाय योजना कराल?मका पिकांच्या अवशेषांमधील अळ््यांचे कपाशी व इतर पिकांवर होणारे संक्रमण रोखण्यासाठी मका पीक काढणीनंतर रोटावेटरच्या साहायाने अवशेषांचे बारीक तुकडे, भुगा करावा. त्यामुळे त्यावरील अळ्या व मातीतील कोष चिरडले जाऊन कीड, अळीचे नियंत्रण मिळण्यास मदत होते. रोटावेटर मारण्यापूर्वी शेतातील अवशेषांवर मेटारायझियम अनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा नोमुरिया रियाली ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकांंची फवारणी केल्यास ते मातीत मिसळले जाऊन जैविक बुरशीद्वारे चांगले नियंत्रण मिळू शकेल. सध्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे हवेतील आर्द्रतेचे अधिक प्रमाण हे जैविक बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरत आहे.

- ही यांत्रिक पद्धती वापरा!कपाशीची प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंडे वेचून अळ््यासहित नष्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.

-रासायनिक पद्धतीचा वापर कसा कराल?पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त कपाशीवर स्पिनेटोरम ११.७ एस सी.- ०८ मिली अथवा क्लोरोंट्रानिलीप्रोल १८.५ एस सी.-०३ प्रती लीटर पाणी याप्रमाणे त्वरित फवारणी करावी.

- जैविक नियंत्रणया उपाययोजनेनंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटारायझियम अनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा नोम्युरिया रियाली ५ ग्रॅम प्रतिलीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीcottonकापूस