शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या उन्हात उष्माघाताची शक्यता; मतदान केंंद्रांच्या ठिकाणी तात्पुरते शेड उभारणार!

By संतोष येलकर | Updated: April 9, 2024 17:03 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, २ हजार ५६ मतदार केंद्रांच्या ठिकाणी मतदान घेण्यात येणार आहे.

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, एप्रिलमधील कडाक्याच्या उन्हात उष्माघाताची शक्यता विचारात घेता मतदारसंघातील शेड नसलेल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात शेड उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी सोमवारी दिली. अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, २ हजार ५६ मतदार केंद्रांच्या ठिकाणी मतदान घेण्यात येणार आहे.

एप्रिल महिन्यात प्रचंड उन्हामुळे उष्माघाताचा धोका निर्माण शक्यता आहे. त्यानुषंगाने उष्माघातापासून बचावासाठी मतदानाच्या दिवशी अकोला लोकसभा मतदारसंघातील ज्या मतदान केंद्रांच्या बाहेर शेड नाही, अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा प्रशासनामार्फत शेड उभारण्यात येणार असून, मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच मतदान केंद्रांच्या पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार यांनी सांगीतले.विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची अशी आहे संख्या !मतदारसंघ मतदान केंद्रअकोट ३३६बाळापूर ३४०अकोला पश्चिम ३०७अकोला पूर्व ३५१मूर्तिजापूर ३८५रिसोड ३३७१०३८ मतदान केंद्रांवर होणार ‘वेब कास्टींग’निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण मतदान केंद्रांच्या ५० टक्के मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग ’ करावयाचे आहे. त्यानुसार अकोला लोकसभा मतदारसंघातील एकूण २ हजार ५६ मतदान केंद्रांपैकी १ हजार ३८ मतदान केंदांच्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग ’ करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार यांनी सांगीतले.‘वेब कास्टींग’ च्या मतदान केंद्रांची अशी आहे संख्या !अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोट विधानसभा मतदारसंघातील १६८, बाळापूर विधानसभा मतदारसंघातील १७०, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील १६०, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील १७७, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील १९३ आणि रिसोड विधानसभा मतदारसंघातील १७० मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग’ करण्यात येणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४collectorजिल्हाधिकारी