शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

नगराध्यक्षांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता

By admin | Updated: June 6, 2014 21:58 IST

लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्यांकरिता वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आकोट : नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षाचा करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या २६ जून रोजी नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे नव्याने नगराध्यक्षांची निवडणूक होणार असली तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्यांकरिता वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगाने आकोट नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.लोकसभेत भाजप-सेना युतीला विदर्भात चांगले यश मिळाले आहे. दुसरीकडे अनेक नगरपरिषदांवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आघाडीच्या कार्यकाळात या नगरपरिषदांनी चांगली विकासकामे केली आहेत तर दुसरीकडे मोदींचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका होईस्तोवर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्याकरिता वाढण्याची शक्यता असून, तशा प्रकारचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आकोट नगरपरिषदेत काँग्रेसचे नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया आहेत. त्यांच्या कार्यकाळात पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासाची कामेसुद्धा झाली आहेत. अशाचप्रकारे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या नगरपरिषदांमध्ये विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे याचा फायदा येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये व्हावा, याकरिता नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिने वाढविण्यात येणार असून, विधानसभेनंतरच नगराध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.