शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’च्या एकाच मासिक परताव्यास मान्यतेची शक्यता; मार्च  महिन्यात ‘जीएसटी’ परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 15:36 IST

अकोला : प्रत्येक महिन्यात तीन परताव्याची भरपाई देण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेला सार्वत्रिक विरोध झाल्याने आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत एकाच मासिक परताव्यास मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देजीएसटी परिषदेच्या बैठकीत एकाच मासिक परताव्यास मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मार्च महिन्यात होऊ घातलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याचे संकेत आहेत.प्रत्येक महिन्याच्या १० व २० तारखेला मोठ्या व लहान करदात्यांना रिटर्न भरणा करणे सोईस्कर करावे, अशी मागणी देशातील विविध भागातील तज्ज्ञांकडून केली गेली आहे.

अकोला : प्रत्येक महिन्यात तीन परताव्याची भरपाई देण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेला सार्वत्रिक विरोध झाल्याने आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत एकाच मासिक परताव्यास मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी मार्च महिन्यात होऊ घातलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याचे संकेत आहेत.महाराष्ट्र आणि देशभरातून प्रत्येक महिन्याच्या तीन परताव्यास विरोध होत होता. तो धागा पकडून देशपातळीवरच्या पदाधिकाºयांनी जीएसटी पोर्टलकडे तक्रार नोंदविली, त्यानंतर सरळ आणि सोपी एकच मासिक परतावा पद्धत काढण्याची मागणी पुढे आली. प्रत्येक महिन्याच्या १० व २० तारखेला मोठ्या व लहान करदात्यांना रिटर्न भरणा करणे सोईस्कर करावे, अशी मागणी देशातील विविध भागातील तज्ज्ञांकडून केली गेली आहे. मागील १८ जानेवारी रोजी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी थ्री-बीच्या एकाच रिटर्न प्रणालीवर चर्चा केली होती. आयटी तंत्रज्ज्ञांनीदेखील यावर आपले मत स्पष्ट केले होते. रिटर्न भरण्याव्यतिरिक्त ई-वे बिलिंगच्या स्थगितीवरही चर्चा झाली होती. १ फेब्रुवारीपासून ई-वे बिलिंगमध्ये अनेक अडचणी समोर आल्यानंतर ई-वे बिलिंगची सक्ती पुढे ढकलण्यात आली. आता जीएसटीच्या एकाच मासिक परताव्यास लवकरच परिषदेची मान्यता मिळण्याचे संकेत आहेत. तशा हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरGSTजीएसटी