शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही वांध्यात येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:48 IST

अकोला : महान धरणातून ६४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आता भर पावसाळ्यात योजनेतील ५५ गावांना दगडपारवा धरण, सुकळी तलावाच्या स्रोतातून पाणी देण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन, वरिष्ठ भूवैज्ञानिकांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ५३५ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत अपुर्‍या पावसाअभावी कोरडे पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.  

ठळक मुद्देपाणीटंचाईवर नियोजन ‘६४ खेडी’साठी दगडपारवा, सुकळी तलावातून पाणी घेणार!स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेने स्त्रोत आटण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महान धरणातून ६४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आता भर पावसाळ्यात योजनेतील ५५ गावांना दगडपारवा धरण, सुकळी तलावाच्या स्रोतातून पाणी देण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन, वरिष्ठ भूवैज्ञानिकांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ५३५ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत अपुर्‍या पावसाअभावी कोरडे पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.  खारपाणपट्टय़ातील ५५ गावांना ६४ खेडी पाणीपुरवठा केला जातो; मात्र ही योजना आता बंद पडली आहे. त्यामुळे या गावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेने या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रातून पुरवठा करण्याचा विभागाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला; मात्र नदीपात्रातून पाणी सोडताना नासाडी प्रचंड होणार आहे, त्यामुळे त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. त्याचवेळी या गावांना पाणीपुरवठा कोठून करावा, ही समस्या कायम आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी कुठेही हायड्रंट्सची सोय नाही. या समस्येवर पावसाळ्याच्या काळात उपाय करण्यासाठी सद्यस्थितीत दगडपारवा धरणातून पाणी घेण्याची तयारी आहे. धरणातील पाण्यावर महिनाभर योजना चालण्याची शक्यता आहे. त्यातही पुरवठय़ाचे नियोजन करावे लागेल. त्याशिवाय, सुकळी तलावात हायड्रंट्सची निर्मिती केली जाईल. त्यातून योजनेतील गावांना पुरवठा होईल. आणखी आठ दिवस पाऊस लांबल्यास ती उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक उपस्थित होते. 

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेने स्त्रोत आटण्याची शक्यता जिल्हय़ातील दोन मोठय़ा योजनांशिवाय तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचीही स्थिती गंभीर होणार आहे. त्यामध्ये वझेगाव, लोहारा, कारंजा रमजानपूर योजनांचा समावेश आहे, तर ५३५ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांपैकी ५0 टक्के स्रोत आटण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्याचा फटका जिल्हय़ातील चार लाखांपेक्षाही अधिक लोकसंख्येला बसणार आहे. 

योजना बंद पडल्याने टंचाईग्रस्त गावेअकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुलतान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहिगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द ही गावे टंचाईग्रस्त आहेत.