झाडावर वीज तारा लोंबकळत असल्याची तक्रार प्रभारी कनिष्ठ अभियंता मंगेश राणे, लाईनमन जाधव यांच्याकडे करून ते काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. पिंजर येथे वीज खांबाजवळ असणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे काम करण्यात आले नाही. महावितरण कंपनीला वर्षाकाठी वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी निधी देण्यात येतो. परंतु हा निधी खर्च केल्या जात नाही. पिंजर महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व कामे केली नाहीत. मंगरूळपीर रस्त्यावरील वाळलेले झाड तोडण्यासाठी कनिष्ठ अभियंता मंगेश राणे, लाईनमन जाधव यांना सांगितले. परंतु त्यांनी काही नागरिकांना ग्रामपंचायतचे पत्र आणण्यास सांगितले. वादळी वाऱ्यामुळे झाड विद्युत तारांवर पडून अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडाच्या फांद्या तोडून वीज तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वृक्षावर वीज तारा लोंबकळल्याने, अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST