शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतच्या कर वसुलीसाठी पॉस मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:37 IST

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना बँकेकडून पॉस मशीन पुरविण्यात याव्या, त्याद्वारे ग्रामपंचायतींची कर वसुली व इतर आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होईल.

अकोला : ग्रामपंचायतींमध्ये विविध कराचा भरणा करण्यासाठी तसेच इतरही आर्थिक व्यवहार करण्यासाठी ‘गाव तेथे एटीएम’ उपलब्ध करण्याचे अभियान राबविण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ठरविले आहे. त्यानुसार या सोयी-सुविधा देण्यात याव्या, असे पत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.जिल्ह्यात ५३५ ग्रामपंचायती आहेत. त्या गावांतील ग्रामस्थांना विविध प्रकारच्या कराचा भरणा करण्यासाठी तसेच इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत गाव-गाव एटीएम अभियान सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे सामान्य फंड व पाणी पुरवठा निधीची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत. त्या खात्यामध्ये ग्रामपंचायतींकडून कराचा भरणा केला जातो; मात्र सध्या सर्व सुविधा आॅनलाइन होत आहेत. नागरिकांना सुविधा पुरविणे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना बँकेकडून पॉस मशीन पुरविण्यात याव्या, त्याद्वारे ग्रामपंचायतींची कर वसुली व इतर आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होईल.प्रत्येक गावात नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी मायक्रो एटीएम योजना सुरू करावी, या सर्व सेवा पुरविताना ग्रामपंचायतींकडून होणाºया व्यवहारांचा आॅनलाइन डिस्प्ले करण्यात यावा, त्याद्वारे नागरिकांना ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती, व्यवहारांची माहिती मिळणार आहे. जिल्ह्यातील ठरावीक ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाची सुरुवात १५ आॅगस्ट रोजी करण्याचे नियोजन करण्याचेही पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत