शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Positive Story : वय वर्ष ९१; सेवानिवृत्त शिक्षकाने कोरोनाला शिकविला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 10:43 IST

Positive Story: लहान उमरी येथील सेवानिवृत्त शिक्षक ९१ वर्षीय शालिग्राम नारायण राऊत यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

ठळक मुद्देऑक्सिजनची पातळी कमी, प्रकृती होती अत्यवस्थयशस्वीरीत्या मात करीत झाले ठणठणीत

- सागर कुटे

अकोला : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असले तरी यावर मात करण्यास अनेकजण यशस्वी ठरत आहे. प्रबळ आत्मशक्ती व सकारात्मक विचारांमुळे शहरातील लहान उमरी येथील सेवानिवृत्त शिक्षक ९१ वर्षीय शालिग्राम नारायण राऊत यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. एचआरसीटी स्कोर ८, ऑक्सिजनची पातळी कमी, प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतरही ते आज रोजी ठणठणीत झाले आहे. शहरातील लहान उमरी भागातील गजानन पेठ येथील सेवानिवृत्त शिक्षक ९१ वर्षीय शालीग्राम नारायण राऊत हे कानशिवणी येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेथे त्यांना ताप, खोकला, अंग दुखीचा त्रास जाणवू लागला. कोरोनाची लक्षणे आढळून येत असल्याने त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात आणले. तेथे त्यांची कोरोना टेस्ट करून एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यांचा एचआरटीसी स्कोर ८ व कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजनची पातळी कमी होत चालली होती. त्यांच्यावर घरी उपचार शक्य नसल्याने नातेवाइकांची व्हेंटिलेटर बेडसाठी शोधाशोध सुरू झाली. एका खासगी दवाखान्यात त्यांना बेड मिळाला. दिवसापरत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. नातेवाइक, आप्तेष्टांनी दिलेल्या सकारात्मक प्रोत्साहनाच्या जोरावर त्यांनी कमी कालावधीत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.

 

केवळ सात दिवसात प्रकृतीत सुधारणा

खासगी दवाखान्यात भरती केल्यानंतर त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यांची प्रो बीएनबी टेस्ट झाली. अशक्तपणा खूप असल्याने दोन बॉटल रक्तही देण्यात आले. यावेळी त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले; कोरोनावर योग्य उपचार व यशस्वी लढा दिल्याने त्यांच्या प्रकृतीत सात दिवसांमध्ये सुधारणा झाली.

 

युवकाला दिला बेड

केवळ सात दिवसांत राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यावेळी एका युवकाला व्हेंटिलेटर बेडची खूप आवश्यकता होती. युवकाची प्रकृतीही मोठ्या प्रमाणात खालावली होती. डॉक्टरांनीही राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी उपचाराचा सल्ला दिला. त्यामुळे राऊत यांनी त्यांचा बेड त्या युवकाला देण्याचा निर्णय घेतला.

 

इतर दिवस घरीच उपचार

सात दिवसांनी दवाखान्यातून ते घरी आले. घरी त्यांची स्वतंत्र खोलीत राहण्याची सोय केली होती. दवाखान्यातून एक कर्मचारी दररोज शालिग्राम राऊत यांची तब्येतीची पाहणी करण्यासाठी येत असे.

 

वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच कुटुंब चिंताग्रस्त झाले होते; परंतु यावेळी मित्रमंडळी व नातेवाइकांनी धीर दिला. आस्थेने विचारपूस करत वेळोवेळी मदत केली. सर्वांच्या एकजुटतेने आलेल्या अडचणींवर मात करता आली.

- प्रा.सुभाष राऊत, मुलगा

टॅग्स :AkolaअकोलाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या