शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

लोकसंख्या पाच लाखांवर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र गॅसवर; शहर बससेवा चार वर्षांपासून बंद

By atul.jaiswal | Updated: July 10, 2023 17:59 IST

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला.

अकोला : छोट्याशा शहराचा विस्तार होऊन महानगरात रूपांतर झालेल्या अकोल्याची लोकसंख्या आज रोजी ५ लाखांपेक्षाही अधिक झाली असली तरी स्थानिक प्रशासनाला अजूनही दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारता आली नाही. महानगरपालिकेची शहर बससेवा गत चार वर्षांपासून बंद असल्याने स्वत:चे वाहन वापरणे किंवा ऑटोरिक्षाची कास धरण्याशिवाय दुसरा पर्यायच नागरिकांपुढे नसल्याने त्यांच्या खिशाला नाहक कात्री लागत आहे. 

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. महानगरपालिकेची हद्दवाढ होऊन लगतच्या २४ गावांचा शहरात समावेश करण्यात आला. परिणामी, शहराच्या भौगोलिक क्षेत्रासोबतच व लोकसंख्येतही भर पडली. शहरातील नागरिकांना वाहतूक व्यवस्था म्हणून महापालिकेने २००४ मध्ये शहर बससेवा सुरू केली होती. एका स्थानिक संस्थेने कंत्राट घेऊन काही वर्षे ही सेवा सुरळीत चालू ठेवली. त्यानंतर मात्र संस्था अवसायनात निघाल्यामुळे बससेवा कोलमडली. अखेर २०१३ मध्ये शहर वाहतूक सेवा बंद झाली. त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये पुन्हा शहर बससेवा सुरू केली. श्रीकृपा ट्रॅव्हल्स नामक कंपनीने १५ ते २० गाड्यांच्या मदतीने शहर बससेवा सुरू केली, मात्र कंपनीच्या संचालकांनी बँकेच्या कर्जाचे कारण पुढे करत ही सेवा पुढे सुरू ठेवण्यात असमर्थतता दर्शविली. त्यामुळे जून २०१९ मध्ये शहर बससेवा बंद पडली. त्यानंतर २०२१ मध्ये शहर बससेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु त्याला यश न आल्यामुळे अकोलेकर अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून वंचितच आहेत.

सात किलोमीटरसाठी ४० रुपयेशहरातील विविध मार्गांवर सिटी बससेवा सुरू होती, तेव्हा नागरिकांना शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी १० ते २० रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागत नव्हता. आता मात्र ही सेवा बंद झाल्यापासून ऑटोरिक्षाचालकांनी मनमानी करत दर वाढविले आहेत. रेल्वे स्थानकावरून बसस्थानक एक टप्पा व बसस्थानकावरून वेगवेगळे नगर हा दुसरा टप्पा, असे दोन टप्प्याचे एका प्रवाशाकडून ४० रुपये घेतले जातात. शहरात सात ते आठ किलोमीटरच्या प्रवासासाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

टॅग्स :Akolaअकोला