वल्लभनगर (अकोला ) - पूर्णा नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषद, महसूल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके आणि पूर्णा बचाव समितीचे अध्यक्ष किशोर बुले यांच्यासह इतर ग्रामस्थांनी पूर्णा नदीच्या पात्रात सुरू केले उपोषण मागे घेण्यात आले. खारपाणपट्टय़ातील हजारो लोकांची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात रसायनमि२िँं१्रूँं१त पाणी सोडून नदीतील पाणी दूषित करणार्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके यांनी सोमवार, ८ डिसेंबर रोजी गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होतो. पूर्णा बचाव संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्तेही त्यांच्यासोबत साखळी उपोषणास बसले होते. अकोला जिल्ह्यातील हजारो लोकांची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात गत वर्षापासून अमरावती येथील एमआयडीसी परिसरातील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या नदीकाठी असलेल्या नळयोजना बंद पडल्या असून, अनेकांना नाइलाजाने दूषित पाणी प्यावे लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता उपोषण मागे घेण्यात आले.
पूर्णा नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार!
By admin | Updated: December 10, 2014 01:45 IST