शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका नसलेल्या गरिबांना हवे धान्याचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:25 IST

जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्याचे कवच देण्याची मागणी होत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले असून, गोरगरीब मजुरांच्या हाताला काम नाही आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका नसल्याने धान्य मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शिधापत्रिका नसलेल्या जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्याचे कवच देण्याची मागणी होत आहे. लॉकडाउनच्या कालावधीत शासनामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजना अंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा वितरित करण्यात येत असलेल्या धान्यासह एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक लाभार्थीला दरमहा ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे. यासोबतच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार आहे; परंतु अकोला शहरासह जिल्ह्यात अनेक गरीब, मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत. जवळ पैसा नाही आणि शिधापत्रिका नसल्याने रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यासंदर्भात उपाययोजनेची गरज असल्याची मागणी होत आहे.

अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक गरीब कुटुंबांकडे पत्रिका नाहीत. लॉकडाउनच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वितरित करण्याची गरज आहे .- शत्रुघ्न मुंडे, जिल्हाध्यक्ष,      

  रास्त भाव दुकानदार संघटना 

जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना धान्य वितरित करण्यासाठी पाययोजना प्रस्तावित आहे.- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akolaअकोला