अकोला : हिमालयीन गिर्यारोहण एक अवघड साहस आहे. हे साहस करताना हिंमत, धैर्य सोबतच आत्मविश्वास लागतो. या गुणांच्या बळावरच अकोल्याच्या पूजा जंगमने माऊंट मेन्थो हे हिमालयीन शिखर सर केले. विशेष म्हणजे पूजाने सर्वात कमी वेळात ही मोहीम पूर्ण करून एक विक्रम स्थापित केला व स्त्रीचे अस्तित्व केवळ चूल आणि मुलापुरते नसून, मनात आणले तर ती अशक्यप्राय गोष्टदेखील आवाक्यात आणू शकते, हे दाखवून दिले आहे. दिल्ली येथील इंडियन माऊंटरिंग फाऊंडेशन या इंडियन आर्मीच्या संचालनात चालविल्या जाणार्या संस्थेच्या माध्यमातून विविध गिर्यारोहण मोहिमांचे आयोजन करण्यात येते. या मोहिमेत देशभरातील गिर्यारोहक सहभागी होतात. यावर्षी या मोहिमेत अकोल्याची पूजा जंगम ही युवती सहभागी झाली होती. तिने समुद्रसपाटीपासून ६,४४३ मीटर उंच असलेल्या हिमालयातील माऊंट मेन्थो शिखर सर करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे फक्त मुलींच्याच असलेल्या या मोहिमेत पश्चिम भारतातून पूजा ही एकमेव आहे. पूजाने २00६ पासून गिर्यारोहणाच्या क्षेत्रात रुची घेतली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेताना तिने क्लम्बिंग स्पोर्टस या प्रकारात जाण्याचे ठरविले. यासाठी तिने अजिंक्य साहसी संघाचे धनंजय भगत यांच्याशी संपर्क साधला. भगत यांनी पूजाला मार्गदर्शन केले. येथून पुढे तिचा गिर्यारोहणात सहभाग वाढत गेला. २00६ मध्ये पूजा राजस्थानमधील सिक्कर येथे क्लम्बिंग स्पोर्टस स्पर्धेसाठी गेली. या स्पर्धेत तिने अंतिम फेरीत धडक मारली होती. पूजाने २00७ मध्ये गिर्यारोहणाचे अधिक प्रशिक्षण घेण्यासाठी बेस कोर्ससाठी उत्तर काशी येथील संस्थेत प्रवेश घेतला. येथे तिने ए ग्रेड मिळविला. २0१0 मध्ये तिने अँडव्हान्स कोर्सदेखील ह्यएह्ण ग्रेड मध्ये पूर्ण केला. २0११ मध्ये पूजाने दिल्ली येथील इंडियन माऊंटरिंग फाऊंडेशनच्यावतीने आयोजित भारतीखुंटा येथील मोहिमेत प्रथम सहभाग घेतला होता.
अल्प वेळात माऊंट मेन्थो शिखर गाठणारी पूजा
By admin | Updated: September 25, 2014 02:47 IST