शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची ‘बडी कॉप’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 10:47 IST

Police's 'Buddy Cop' scheme for women's safety : कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत अकोला पोलिसांनी बडी कॉप योजना जोरात सुरू केली आहे.

- सचिन राऊत

अकोला : कामाच्या ठिकाणी तसेच कामावरून घरी जाताना किंवा घरून कामावर जाताना रस्त्यात महिला, युवतींचा शारीरिक छळ तसेच अश्लील शेरेबाजी रोखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत अकोलापोलिसांनी बडी कॉप योजना जोरात सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर दोन ते तीन पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून नोकरी तसेच इतर कोणतेही काम करणाऱ्या महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात येत आहेत.

राज्यभर शासकीय तसेच खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला व युवतींचा लैंगिक छळ झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या ठिकाणांसोबतच त्या महिला घरी जाताना किंवा घरून कामावर येताना रस्त्यामध्ये त्यांचा छळ झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत बडी कॉप ही योजना कार्यान्वित करून अशा महिलांना सुरक्षा प्रदान करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात बडी कॉप योजना कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र काही जिल्ह्यात अद्यापही या योजनेचे कामकाज सुरू झाले नसल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यात योजनेसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील या सर्व बाबींवर वाॅच ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षात एका अधिकाऱ्याला विशेष पदभार देण्यात आलेला आहे.

 

पोलीस महासंचालकांची संकल्पना

राज्यात शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये व इतर ठिकाणांवर काम करणाऱ्या महिला व मुलींचा छळ होत असल्याच्या असंख्य तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून बडी कॉप योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

बहुतांश जिल्ह्यात अंमलबजावणी नाही

कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ रोखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत बडी कॉप योजना राबविण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांनी दिल्यानंतरही बहुतांश जिल्ह्यात ही योजना कार्यान्वित नसल्याची माहिती आहे.

 

महिलांना तत्काळ मदत

अकोला पोलिसांनी बडी कॉप ही योजना कार्यान्वित केली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून महिला व युवतींशी संपर्क ठेवण्यात येत आहे. त्यांना कोणतीही अडचण आल्यास संबंधित कर्मचारी त्यांची अडचण तातडीने सोडविण्यास प्राधान्य देत आहे.

२५ पेक्षा जास्त व्हाॅट्सअप ग्रुप

संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या महिला खासगी, शासकीय नोकरी किंवा इतर कोणतेही काम करीत असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन अशा महिलांचा व्हाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. या ग्रुपचे ॲडमिन संबंधित पोलीस कर्मचारी आहेत. महिलांना केव्हाही असुरक्षित भावना वाटली तर त्या तातडीने ग्रुपवर मेसेज टाकतात आणि संबंधित कर्मचारी त्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी जिल्हाभर २५ पेक्षा अधिक व्हाॅट्सअप ग्रुप तयार केल्याची माहिती आहे.

 

अकोला जिल्ह्यात बडी कॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या योजनेचे विशेष प्रोग्राम घेण्यात आलेले नाहीत; मात्र आता नव्याने या योजनेचे कामकाज सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक अकोला

 

बडी कॉप योजना म्हणजे महिलांना सुरक्षा प्रदान करणारे पोलीस

जिल्ह्यात बडी कॉप - ४९

महिलांसाठी व्हाॅट्सॲप ग्रुप -५०

जिल्ह्यात काम करणाऱ्या महिला - १३,००० सुमारे

लैंगिक छळाच्या तक्रारी - ३९६

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस