शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचा-याने महाराजांवर रोखली पिस्तुल

By admin | Updated: January 28, 2015 00:15 IST

म्हणे, १५ वा अध्याय म्हण; गुन्हा दाखल; खामगाव-नांदुरा मार्गावरील घटना.

जलंब (बुलडाणा): वाराणसी येथील महाराजांना अडवून त्यांच्यावर पिस्तुल रोखून, ह्य१५ वा अध्याय म्हण, नाहीतर गोळी घालतोह्ण, अशी धमकी देणे पोलीस कर्मचार्‍याच्या अंगलट आले आहे. ही घटना २६ जानेवारीच्या रात्री १ वाजता खामगाव-नांदुरा दरम्यान चिखली आमसरी फाट्यानजीक घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचार्‍यास अटक केली आहे. धमकी देणारा पोलीस कर्मचारी हा खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांचा अंगरक्षक आहे. वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील शंकरानंद सरस्वती दंडेस्वामी (वय ६३) नाशिक येथून कारंजाकडे मारुती कारने जात होते. नांदुरा ते खामगाव दरम्यान चिखली फाट्यानजीक त्यांची गाडी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांना पेट्रोलिंगवर असलेल्या जलंब पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने एका ढाब्यावर आणून सोडले व निघून गेले. त्यानंतर बुलडाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी विष्णू काटोले (वय ३१,. रा. अटाळी) हा तेथे आला. त्याने शंकरानंद सरस्वती दंडेस्वामी महाराज यांची चौकशी सुरू केली. त्याने महाराजांना गीतेचा १५ वा अध्याय म्हणावयास सांगितले. शंकरानंद यांनी त्यास नकार दिल्याने काटोलेने शंकरानंद आणि त्यांच्या वाहनाच्या चालकावर पिस्तुल रोखत त्यांना गोळी घालण्याची धमकी दिली; तसेच त्याने लोटपाट करून अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी शंकरानंद सरस्वती दंडेस्वामी यांनी जलंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी पोलीस कर्मचारी विष्णू काटोलेविरुद्ध भादंविचे कलम ३0७, २९४, ५0६ तसेच आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल केला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जी.श्रीधर करीत आहेत.