शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या लवकरच बदल्या; यादी मागविली!

By admin | Updated: April 7, 2017 00:52 IST

अकोला- पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार आहेत. पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून १० एप्रिलपर्यंत अर्ज मागविले आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार पसंतीची तीन ठिकाणे

अकोला : पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार आहेत. त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलीस ठाण्यांमध्ये पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून १० एप्रिलपर्यंत अर्ज मागविले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतरच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्या करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम २००५ नुसार बदल्या करण्यात येणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना एका पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीच्या तारखेपासून ३१ मे २०१७ पर्यंत पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा विशेष शाखा येथे तीन वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या स्वग्राम असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी नेमणूक, बदली करण्यात येणार नाही. पोलीस मुख्यालयात काम करीत असलेल्या संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू राहणार नाही. यासोबतच एका पोलीस स्टेशनमधील खंडित, अखंडित सेवा धरून पाच वर्षे पूर्ण झालेल्या आणि एका तालुक्यात खंडित, अखंडित दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बदली प्रक्रिया राबविताना पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पसंतीच्या ठिकाणी बदली मागण्याचा अधिकार राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. बदलीपात्र पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बदलीसाठी विनंती अर्जासोबत सहपत्र ब नमुन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे १० एप्रिलपर्यंत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदलीसाठी पोलिसांना पसंतीची तीन ठिकाणे द्यावी लागणार आहेत. बदलीसंदर्भात गैरवर्तन केल्यास त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे.