शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी पकडली ४३ लाख रुपयांची रोकड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:28 IST

ऑटोरिक्षातून ४३ लाखांची रोकड घेऊन रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या व्यापार्‍यास सिव्हिल लाइन पोलिसांनी पाठलाग करून रस्त्यात मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पकडले. पोलिसांनी त्याच्याकडील रोकड जप्त केली असून, जप्त केलेल्या नोटांमध्ये ५00 व २000 रूपयांच्या नवीन नोटा आहेत. ही रक्कम हवालातील असल्याचा पोलिसांनी संशय आहे. 

ठळक मुद्देरोकड हवाल्यातील असल्याचा संशयपाठलाग करून व्यापार्‍यास घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऑटोरिक्षातून ४३ लाखांची रोकड घेऊन रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या व्यापार्‍यास सिव्हिल लाइन पोलिसांनी पाठलाग करून रस्त्यात मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पकडले. पोलिसांनी त्याच्याकडील रोकड जप्त केली असून, जप्त केलेल्या नोटांमध्ये ५00 व २000 रूपयांच्या नवीन नोटा आहेत. ही रक्कम हवालातील असल्याचा पोलिसांनी संशय आहे. रणपिसे नगरात राहणारा व्यापारी संतोष कन्हैयालाल राठी (४२) हा मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एमएच ३0 पी ९७0३ क्रमांकाच्या ऑटोरिक्षामध्ये ४३ लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन रेल्वे स्टेशनकडे जात होता. विदर्भ एक्स्प्रेस रेल्वेगाडी पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी व त्यांच्या पोलीस चमूने ऑटोरिक्षा पाठलाग करून रस्त्यातच ऑटोरिक्षा थांबविला आणि व्यापारी संतोष राठी याच्या बॅगेची झडती घेतली. बॅगेमध्ये ४३ लाख रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांना दिसून आल्यावर पोलिसांनी त्याला सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर व्यापारी संतोष राठी याने ही प्लॉट खरेदीसाठी शेगाव येथे नेत असल्याचे सांगितले; परंतु पोलिसांना ही रोकड हवालातील असल्याचा संशय आहे. पोलिसांनी मशीनद्वारे नोटा मोजल्यानंतर ही रक्कम ४३ लाख रुपये भरली. पोलिसांनी ऑटोचालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ठाणेदार अन्वर शेख यांनी भादंवि कलम ४१ ड नुसार आयकर विभागाला माहिती दिली. त्यामुळे व्यापारी संतोष राठी याने एवढी मोठी रक्कम कुठून आणली आणि तो ही रक्कम कुठे नेणार होता, याची चौकशी आयकर विभाग करणार आहे. राठी हा कुकर, मिक्सर विक्रीसोबतच ग्रेन र्मचंटचा व्यवसाय करतो. ही कारवाई पोलीस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात हरिश्‍चंद्र दाते, शिवा बावस्कर, उकार्डा जाधव, सचिन दांदळे, गजानन बांगर यांनी केली. 

रोकडसोबतच बॅगेत खेळणी, पेढय़ांचे डबेपोलिसांनी संतोष राठीकडून बॅग जप्त केल्यानंतर त्यात रोकडसोबतच लहान मुलांचे खेळणी, पेढय़ांचे डबे, कपडे आणि जेवणाचा डबा मिळून आला. राठी याची चौकशी केल्यावर त्याने ही रक्कम शेगाव येथे प्लॉट खरेदीसाठी नेत असल्याची पोलिसांसमक्ष माहिती दिली; परंतु बुधवारी त्याच्या चौकशीतून त्याने ही रोकड कोठून आणली आणि कशासाठी तो ही रक्कम नेत होता, याचा उलगडा होईल.