शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब आंबेडकरांना पोलीस संरक्षण द्या; देवळी ग्रामपंचायतने घेतला एकमताने ठराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:34 IST

अकोला : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या कल्याणासाठी भारतभर फिरून रात्रंदिवस झटत असतात. ते बहुजनांच्या हितासाठी आंदोलने करतात. बहुजनविरोधी समाजकंटकांकडून त्यांच्या जीवास धोका होऊ शकतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, असा ऐतिहासिक ठराव अकोला तालुक्यातील देवळी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी १२ जानेवारी रोजी ग्रामपंचायतच्या आयोजित सभेत एकमताने पारित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या कल्याणासाठी भारतभर फिरून रात्रंदिवस झटत असतात. ते बहुजनांच्या हितासाठी आंदोलने करतात. बहुजनविरोधी समाजकंटकांकडून त्यांच्या जीवास धोका होऊ शकतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, असा ऐतिहासिक ठराव अकोला तालुक्यातील देवळी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी १२ जानेवारी रोजी ग्रामपंचायतच्या आयोजित सभेत एकमताने पारित केला.देवळीच्या उपसरपंच वैशाली विकास सदांशिव यांनी या ठरावाची सूचना मांडली. ग्रामपंचायत सदस्य देवानंद सदांशिव यांनी अनुमोदन दिले. सरपंचासह ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने पारित केला. या ठरावाच्या सुचक असलेल्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैशाली विकास सदांशिव या भारिप-बमसं पक्षाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष विकास सदांशिव यांच्या पत्नी आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांच्याप्रती श्रद्धा ठेवून केंद्र व राज्य सरकारने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणारी देवळी ही राज्यातील कदाचित पहिलीच ग्रामपंचायत असावी.कोरेगाव भीमा प्रकरण बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय आक्रमकपणे लावून धरले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी सर्वांनाच आहे. त्यानुसार हा ठराव घेतला आहे. या ठरावानुसार केंद्र व राज्य शासन बाळासाहेब आंबेडकरांना पोलीस संरक्षण देणार का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.     

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणgram panchayatग्राम पंचायत